शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुविहारमध्ये प्लॅस्टर कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:41 IST

खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली.

पनवेल : खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली. दुपारी १.३०च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी या गृहप्रकल्पातील निकृष्ट काम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.सिडकोने येथे जवळपास दोन हजार घरे उभारली आहेत. २००९ मध्ये रहिवाशांना या घरांचा ताबा देण्यात आला आहे. अवघ्या दहा वर्षांच्या आतच येथील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकप्रकारे आमची फसवणूक झाल्याचा आरोप येथील रहिवाशांनी सिडको प्रशासनावर केला आहे. सिडकोने नुकत्याच विविध नोडनिहाय घरांच्या सोडती जाहीर केल्या. या गृहप्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, नऊ वर्षांपूर्वी सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार प्रकल्पाची दुरवस्था पाहता भविष्यात उभारल्या जाणाºया गृहप्रकल्पाची निर्मिती योग्य पद्धतीने व टिकाऊ दर्जाची असणे गरजेचे आहे. खारघर सेक्टर-१५ मधील घरकूलसह वास्तुविहार या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्यांना येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत, पाण्याच्या टाक्यांना गळती लागली आहे, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत. प्लॅस्टर कोसळून रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाºया घटनादेखील या ठिकाणी अनेक वेळा घडल्या असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणच्या समस्या वारंवार सिडकोच्या निदर्शनास आणूनदेखील सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.सिडको व गृहप्रकल्पाचे ठेकेदार यांच्यातील या प्रकल्पाच्या उभारणीच्या कराराची मागणी आम्ही वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे करीत आहोत. मात्र, सिडको प्रशासन आम्हाला या कराराची माहिती देत नाही. लवकरच याकरिता माहितीच्या अधिकारात मागणी मागविणार असल्याचे वास्तुविहार केएच-२ हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष समीर कदम यांनी सांगितले.