शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर महापालिका वृक्ष लागवड करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:53 IST

प्रस्ताव स्थायी समितीकडे : ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च होणार

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वृक्षलावगड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये पाठविण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्षलावगड व हिरवळ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान २०० पेक्षा जास्त उद्यान व हरित पट्टे आहेत. पामबीच व ठाणे-बेलापूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे, यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.

जुईनगर रेल्वेस्टेशन व पामबीच रोडवर ज्वेल्सच्या काही भागात वृक्षांच्या सावलीमुळे उन्हाच्या झळा बसत नाहीत. याच धर्तीवर शहरात इतर ठिकाणी हरित पट्टे विकसित केले जात आहेत. सायन-पनवेल महामार्गावरही वृक्ष लावगड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशी ते बेलापूर दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात ही वृक्षलावगड केली जाणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला हरित पट्टे विकसित झाले नसल्यामुळे त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊ लागला आहे. धूलिकणांचे प्रमाण या परिसरात जास्त आहे. या परिसरामध्ये वृक्षलावगड करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध असल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात ही वृक्षलागवड केली जाणार आहे.

गेल्या वर्षी मिळाली प्रशासकीय मंजुरीमहापालिकेने मे २०१८ मध्ये यासाठी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी घेतली होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, जी अ‍ॅण्ड जी कंपनीने सर्वात कमी दर सादर केले आहेत. अंदाजपत्रकीय दरापेक्षा एक टक्का कमी दराने निविदा सादर केली आहे. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. येणाºया स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग