शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

मालमत्ताकर वसूलीच्या उद्दीष्टपूर्तीसाठी आढावा बैठकीत नियोजन

By योगेश पिंगळे | Updated: February 22, 2024 17:36 IST

नवी मुंबई : २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असणाऱ्या मालमत्ताकर वसुलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ...

नवी मुंबई : २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असणाऱ्या मालमत्ताकर वसुलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिल्याने मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातील ४१७.१८ कोटी रक्कम वसुलीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात जानेवारी २०२४ पर्यंत १०० कोटी रक्कमेची अधिकची वसुली अर्थात ५२० कोटी इतकी वसूली झालेली आहे. या वर्षी ८०० कोटी रक्कमेचे मालमत्ताकर वसूली उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी समूहाने मालमत्ताकर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

उद्दीष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या स्तरावर वसुलीचे नियोजन करावे व ते कालावधीची मर्यादा ठरवून ते साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधीकारी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने विभागवार यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून दिले व याकडे बारकाईने नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. नोटीसींना प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर पुढील कायदेशीर कारवाई करत मालमत्ता जप्त करुन आवश्यकतेनुसार त्यांचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश ढोले यांनी दिले. लिडार सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांचे विभागामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन मालमत्ताकराची डिमांड नोटीस देण्याबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती आणि एमआयडीसी क्षेत्र येथील मालमत्तांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अशाच प्रकारे गावठाण विभागात बांधलेल्या इमारतीतील घरांना स्वतंत्र मालमत्ताकर देयके वितरीत करुन अधिकाधिक मालमत्ता या कराच्या कक्षेत येतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विविध अंगाने मालमत्ताकराची थकबाकी वसूली करण्यासोबतच करनिर्धारण झालेल्या नवीन मालमत्ता हया मालमत्ताकराच्या कक्षेत येण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व या माध्यमातून मालमत्ताकराचे लक्ष्य साध्य करण्यावर भर दयावा अशाही सूचना ढोले यांनी दिल्या. ८०१ कोटी हे या वर्षींचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट व ९०० कोटी हे आगामी वर्षातील उद्दीष्ट साध्य करणे नियोजनबध्द काम केल्यास अशक्य नाही हे स्पष्ट करीत यामध्ये कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांची दिरंगाई आढळल्यास जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुकत ढोले यांनी दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई