शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम पोचल्या मतदान केंद्रांवर, पोलिस बंदोबस्तात निवडणूक साहित्यांचे नियोजनबद्ध वाटप

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 19, 2024 19:29 IST

नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक ...

नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक केंद्रातून ४२९ इलेकट्रीक वोटिंग मशीनसह इतर साहित्य पाठवण्यात आले. चोख पोलिस बंदोबस्तात कोणत्याही गोंधळाविना हि प्रक्रिया पार पडली.

मागील दीड महिन्यांपासून उमेदवारांसह मतदारांना प्रतीक्षा असलेला मतदानाचा दिवस अखेर उगवला आहे. ठाणे लोकसभेसाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७७ केंद्रांमध्ये ४२९ बुथवर सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी रविवारी ऐरोली येथील निवडणूक केंद्रातून पोलिस सुरक्षेत ईव्हीएम पाठवण्यात आल्या. त्यासाठी सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाने यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण प्रक्रिया झाली. यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रेय बेर्डे, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश बदले, तहसीलदार राहुल सारंग, सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे यांच्यासह इतर निवडणूक अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

मागील वेळेस मशीन वाटपदरम्यान गोंधळामुळे प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रक्रियेत शिस्तबद्धता आणून नियोजनबद्धरीत्या मशीनचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सकाळी ९ वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी १२.३० पर्यंत पूर्ण होऊन सर्व मशीन मतदान केंद्राकडे रवाना झाल्या. त्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तयारीला लागले होते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याठिकाणी सहायक पोलिस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण देखील केले जात होते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया वेळेत व निर्विघ्न पार पडल्याने दुपार पर्यंत सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोहचवण्यात यंत्रणेला यश आले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूक 2024