शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय गाढेश्वरचा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:33 IST

पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे.

- मयूर तांबडे पनवेल : पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित होतात. पहिल्याच पावसात यावर्षी सुध्दा गाढेश्वर धरणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाढेश्वर (देहरंग) धरणाचा समावेश होतो. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक धरणावर येत असतात. पनवेलपासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. शनिवार आणि रविवार सुटीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणात मौजमजा करण्यासाठी येतात. पर्यटक या ठिकाणी मद्यप्राशन करून पाण्यात पोहण्यासाठी जातात, तर काही पर्यटक आपल्या कुटुंबासह या परिसरात येत असतात. मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोल असलेल्या पाण्यात जातात. येथील पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजून येत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव याहीवर्षी गाढेश्वर धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आठवड्याच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे पर्यटकांचा ओढा गाढेश्वर धरणाकडे वाढू लागला आहे. असे असले तरी धरणात अद्याप पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे पर्यटकांना रोखण्यासाठी किंबहुना त्यांची समजूत काढण्यासाठी या मार्गावरील वाजे फाट्याजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तालुका पोलिसांनी सूचनांचे फलक परिसरात लावलेले आहेत. परिसरात अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक पदार्थ बाळगताना अथवा पिताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचना फलकात लिहिलेले आहे. तरी देखील काही मद्यपी रविवारी धरणाच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्या गाडीसह त्यांना परत पाठविले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.