पनवेलची १२० वर्ष ऐतिहासिक राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गँलरीत  

By वैभव गायकर | Published: February 3, 2024 05:04 PM2024-02-03T17:04:13+5:302024-02-03T17:04:57+5:30

युवा चित्रकार केविन डायसच्या चित्रांची राष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड.

Picture of panvel's 120 year historic rice mill at jahangir art gallery | पनवेलची १२० वर्ष ऐतिहासिक राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गँलरीत  

पनवेलची १२० वर्ष ऐतिहासिक राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गँलरीत  

वैभव गायकर ,पनवेल: पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.पनवेलच्या वेगवगेळ्या ऐतिहासिक वस्तूंच्या छटा कागदावर जशाचा तशे उमटवणाऱ्या युवा चित्रकार  केविन डायस याने काढलेली दोन चित्रांची निवड मुंबईत होणाऱ्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात झाली आहे. पनवेलमधील 120 वर्षे जुन्या युसूफ राईस मीलचे केविन डायसने गतवर्षी काढले होते.हे चित्र राष्ट्रीय वर्षी कला प्रदर्शनात झळकत आहे.      

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान मुंबई फोर्ट येथे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 106 व्या राष्ट्रीय वार्षिक कलाप्रदर्शन सुरू आयोजित करण्यात आले आहे. खुला आणि विद्यार्थी गटात देशभरातून विद्यार्थी चित्र पाठवत असतात.चित्रकला क्षेत्रात नामांकित समजल्या जाणाऱ्या चित्रकला प्रदर्शनात पनवेलच्या केविन डायस याचे दोन चित्रांची निवड झाली आहे. एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या शहरात अनेक मिल आहेत. 

यापैकीच एक असलेल्या 120 वर्षे जुन्या युसूफ राईस मिलचे चित्र केवीनने वॉटरकलरमध्ये रेखाटले होते. तसेच औरंगाबाद शहरातील गोगाबाब डोंगरावरून दिसणाऱ्या बीबी का मकबरा आणि निसर्गांचे पावसाळ्यातील चित्रांची निवड या प्रदर्शनात झाली आहे. याबद्दल केवीनचे वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. केविन डायस हा तरूण चित्रकार म्हणून प्रसिध्द आहे. गतवर्षी कश्मिरमध्ये झालेल्या स्पर्धेत केविनने बाजी मारून शिष्यवृत्ती पटकावली आहे. नुकत्या नाशिक येथे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन पार पडलेल्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स स्पोर्टच्या युथ गेम्समध्ये देखील यंग आर्टिस्ट कँम्पमध्ये सहभाग घेतला होता.

Web Title: Picture of panvel's 120 year historic rice mill at jahangir art gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.