शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली तूरडाळ विकण्यास परवानगी

By admin | Updated: November 24, 2015 01:57 IST

काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत साडेनऊ हजार मेट्रिक टन तूरडाळ आढळली होती

पनवेल : काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत साडेनऊ हजार मेट्रिक टन तूरडाळ आढळली होती. त्यामधील एकूण साडेसहा हजार मेट्रिक टन डाळ सवलतीच्या दरात विक्रीकरिता बाहेर काढण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कमीत कमी ९५ आणि जास्तीतजास्त शंभर रुपये दराने ग्राहकांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे. राज्यात निर्माण झालेले दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कडधान्याचे पीक आले नाही. विशेष करून तूर, मूग व मटकीच्या पिकावर पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे साहजिकच डाळींचे उत्पन्न सुध्दा कमी झाले. परिणामी किमतीत वाढ झाली आहे. रोजच्या आहारात वरणाचा समावेश असल्याने त्याकरिता चढ्या भावाने डाळ खरेदी करावी लागत आहे. त्यातल्या त्यात तूरडाळ प्रति किलो पावणे दोनशे रुपयांवर गेली आहे. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहेच त्याचबरोबर अवेळी पडलेल्या पावसामुळे कडधान्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर, मूग, मटकी त्याचबरोबर उडदाच्या डाळीच्या किमती वाढलेल्या आहेच. या व्यतिरिक्त व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्यामुळे भाव गगनाला पोहचले असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले.या अनुषंगाने देशभरात पुरवठा विभागाने काही दिवसांपूर्वी धाडसत्र सुरू केले होते. पनवेल तालुक्यातही खरेदी अधिकारी युवराज बांगर, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अजिवली, डेरवली आणि कळंबोली या ठिकाणी वेअर हाऊस व गोदामावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. अकाश, इडलवाईज अक्षय, केअर टेकर्स, ईडीडी या वेअर हाऊसेसचा समावेश होता. संबंधित व्यापारी व वेअर हाऊस मालकांनी क्षमतेपेक्षा जास्त कडधान्य, डाळी एकत्रित ठेवल्याचे आढळून आले. हा माल त्याच गोदामात ठेवण्यात आला होता. शासनाकडून ही डाळ ग्राहकांना सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. जप्त केलेली डाळ शंभर रुपये किलो दराने देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील गोदाम मालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी बाँड लिहून घेतले आहेत. त्यानंतर त्या गोदामातील डाळ रिलिज करण्याची परवानगी संबंधितांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)