शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन व्हावे

By admin | Updated: June 16, 2016 01:19 IST

नियोजित पनवेल महानगरपालिका पनवेलच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत प्रभावी ठरणार आहे? शासनाने याकरिता अधिसूचना देखील काढली आहे. पालिकेमध्ये समाविष्ट रहिवाशांनी याकरिता

पनवेल : नियोजित पनवेल महानगरपालिका पनवेलच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत प्रभावी ठरणार आहे? शासनाने याकरिता अधिसूचना देखील काढली आहे. पालिकेमध्ये समाविष्ट रहिवाशांनी याकरिता आपल्या हरकती, सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. नियोजित पनवेल महानगरपालिकेत सिडकोचे सात नोड आहेत. त्यामध्ये खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा पाचनंद, नावडे हे विकसित आणि अविकसित नोड. नैना क्षेत्रातील ३६ गावे आणि नवी मुंंबई एसईझेड क्षेत्र तसेच सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. नोडमधील विशेषत: खारघर क्षेत्र, नैना आणि एसईझेड ही सर्व क्षेत्रे विकसनशील असून सिडको व नवी मुंबई एसईझेड कंपनीला या भागांचा अद्याप विकास करावयाचा आहे. सिडकोच्या या भागात मेट्रो, बीकेसीसारखे वाणिज्य संकुल, तर ५५ हजार गृहनिर्मिती करण्याचा मानस आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेल महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. अनेकांनी या महानगरपालिकेचे स्वागत केले आहे, तर काही नागरिक महानगरपालिकेला विरोध करीत आहेत. काही राजकीय पक्ष व कार्यकर्ते अगदी निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. (प्रतिनिधी)नियोजित पनवेल महानगरपालिकेत खारघर, करंजाडे, नैना क्षेत्र, उलवा यांचा समावेश करून सिडकोचे नागरी सेवाकरिताचे भूखंड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावेत. सध्या सिडको नोडमध्ये प्रकल्पग्रस्तांचे देखील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. महानगरपालिकेला आमचा विरोध नसला तरी संबंधित सर्वच प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सध्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेबद्दल नागरिकांच्या मनात विविध शंका आहेत. त्यामध्ये कर, त्याचे स्वरूप, व्यापारीवर्गामध्ये एलबीटी चिंता, पाणीपट्टी, सर्व्हिस चार्जेस याबद्दल सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शासनाने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. - राजेश गायकर, कामोठे शहर संघर्ष समिती प्रस्तावित पनवेल महानगरपलिकेला प्रामुख्याने स्वतंत्र पाण्याचे नागरी निवारण करण्यासाठी स्वत:चे धरण (पाणीपुरवठा), वीजप्रकल्प, कचरा निवारण (डम्पिंग ग्राउंड) आदी प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे अन्य स्थानिक संस्थांवर याकरिता अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिका कार्यहीन राहील. महानगरपालिका स्थापन करण्याऐवजी लहान नगरपंचायती स्थापन कराव्यात. तसेच सिडको, एमआयडीसी, आदीसह इतर संस्थांच्या भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे. - भरत पाटील, अध्यक्ष, पनवेल विकास समिती