शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

राजकीय पक्षांना स्थायीचे वेध

By admin | Updated: October 28, 2014 23:10 IST

पालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समिती सदस्यांची व सभापती पदाची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातली असून त्याचे वेध स्थानिक राजकीय पक्षांना आत्तापासूनच लागले आहेत.

राजू काळे ल्ल भाईंदर
पालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समिती सदस्यांची व सभापती पदाची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातली असून त्याचे वेध स्थानिक राजकीय पक्षांना आत्तापासूनच लागले आहेत. स्थायीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपा युतीच्या सदस्यांची समान असून यंदाचे सभापतीपद मात्र कोणाच्या पदरी पडणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
पालिकेत सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांत 1 अपक्षासह राष्ट्रवादीचे 27, काँग्रेसचे 19, विरोधी पक्षातील युतीच्या सदस्यांत भाजपाचे 28, 1 मनसेसह शिवसेनेचे 15, बहुजन विकास आघाडी (बविआ)चे 3 सदस्य आहेत. एकुण 95 नगरसेवकांपैकी 92 नगरसेवक पदावर असून उर्वरीत 3 पैकी 2 जागा रिक्त तर 1 पदावरील वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी बविआला सभापतीपदाचे आश्वासन देऊन त्यांना आपल्या बाजूने खेचले होते. सभापतीदाच्या निवडणुकीवेळी मात्र मेंडोन्सा यांनी भाजपाच्या सीमा शाह यांना फोडण्यात यश मिळविल्याने राष्ट्रवादीने स्थायी काबीज केली होती. 
दुस:या टर्मवेळी भाजपाने बविआलाच छेद देत त्यांना आपल्या बाजूने खेचून स्थायी सदस्य बविआचे राजू भोईर यांना फोडण्यात यश  मिळवुन सभापतीपद आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. यंदाची सदस्य निवड नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यात यंदाच्या स्थायीचे सभापतीपद कोणता पक्ष गनिमी काव्याने हस्तगत करेल, यासाठी आत्तापासुनच फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. सध्या स्थायीत आघाडी व युतीच्या सदस्यांची संख्या समान असुन त्यात राष्ट्रवादी व भाजपाचा सदस्य फोडाफोडीचा गेम महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी बविआने निवडणूक काळातच राजकीय सेटिंग केल्याची चर्चा सुरु झाली असली तरी स्थायीतील समान सदस्य संख्येमुळे सभापतीपद चिठ्ठीद्वारे अथवा सदस्य फोडाफोडीच्या राजकारणातुनच आघाडी अथवा युतीच्या पदरात पडणार असल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.