शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:53 IST

टपाल कार्यालयात जागेचा अभाव आणि केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रिया आदीमुळे पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

पनवेल : टपाल कार्यालयात जागेचा अभाव आणि केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रिया आदीमुळे पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पनवेलकरांना आणखी काही महिने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पनवेलसह रायगड जिल्ह्यात एकही पासपोर्ट कार्यालय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसंदर्भातील कामासाठी थेट ठाणे येथे जावे लागते. यावर उपाय म्हणून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेलमध्ये स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय व्हावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यास परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असेल, तर आॅनलाइन प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागते. विशेष म्हणजे याकरिता देण्यात येणाऱ्या ठरावीक वेळेत पासपोर्ट कार्यालय ठाणे याठिकाणी पोहचणे गरजेचे असते. मात्र या कार्यालयात पोहचताना अनेक वेळा वाहतूककोंडीचे विघ्न अनेकांसमोर येत असल्याने त्या कालावधीत पासपोर्ट कार्यालयात पोहचणे काहींना अवघड होते. अशावेळी तो संपूर्ण दिवस वाया जातो.ही समस्या ओळखून रायगड जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग असलेला व जिल्ह्यातून सहजरीत्या पोहचता येणारे ठिकाण म्हणून पनवेल शहर ओळखले जाते. त्यामुळे पनवेल शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली होती. परंतु केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रि येमुळे सध्या हे पासपोर्ट केंद्र लांबणीवर गेले आहे.तीन महिन्यांपूर्वी खुद्द बारणे यांनी पनवेलमध्ये पुढील सहा महिन्यांत हे पासपोर्ट कार्यालय सुरू होईल, असे सांगितले होते. पासपोर्ट कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला होता. याकरिता नवीन पनवेल येथील पोस्ट आॅफिसमध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. तसे पत्र पासपोर्टच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयाला पाठविले होते. परंतु तीन महिने उलटले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता हे कार्यालय सुरू होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पासपोर्ट आवेदनात खारघर जिल्ह्यात अव्वलपनवेल तालुक्यातील खारघर हे झपाट्याने विकसित होत आहे. येथील लोकसंख्या जवळपास चार लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पासपोर्ट आवेदनाच्या बाबतीत खारघर शहर अव्वल आहे. २0१७ मध्ये जवळपास आठ हजार नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. सध्या दिवसातून वीस ते पंचवीस अर्ज प्राप्त होत असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले.