शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका रुग्णालयांत सुरू होणार जनऔषधी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:19 IST

शहरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रु ग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शहरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शहरातील महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात शहरातील गोरगरीब नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. नागरिकांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय परिसरात प्रधानमंत्री जनऔषधी विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जनऔषधी विक्री करणाºया एजन्सीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, यामध्ये पात्र एजन्सीमार्फत केंद्र चालविण्यासाठी महापालिका रुग्णालयातील जागेच्या भाड्यापोटी दरमहा दोन लाख १६ हजार रु पये रक्कम प्राप्त होणार आहे. हा प्रस्ताव शुक्र वार, १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे. यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी, या ठिकाणी फक्त जनऔषधे असणार आहेत की इतरही औषधे असणार, याबाबत विचारणा केली. नगरसेविका सरोज पाटील यांनी, महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात अशाप्रकारची केंद्र सुरू करण्याची मागणी केली. नगरसेवक रंगनाथ औटी यांनी शहरातील प्रत्येक नोड तसेच महापालिकेच्या सर्व बालमाता रु ग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी केली. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी आणि पाठपुरावा केला होता. हा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आल्याने आनंद होत असल्याचे सांगत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक नोडमध्ये जनऔषधी केंद्र सुरू करावे, तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनी सर्व केंद्र सुरू करण्याची मागणी केली. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी, महापालिकेचे डॉक्टर रु ग्णांना जनऔषधेच की इतर औषधे देणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी, जनऔषधी केंद्रात फक्त जनऔषधी उपलब्ध असणार आहेत. जनऔषधांची यादी डॉक्टरांना देण्यात येणार असून, रुग्णांनाही बाजारात उपलब्ध असलेली जनऔषधीच देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी वाशी येथील रु ग्णालयात सुरू होणाºया जनऔषधी केंद्रामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल; परंतु शहरातील नागरिकांना प्रत्येक नोडमध्ये जनऔषधांचा लाभ घेता यावा, नोडनिहाय केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे आदेश दिले.।कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांच्या नेमणुकानवी मुंबई शहरातील नागरिकांना मिळणाºया आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारावा, तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार असून यामध्ये कान, नाक व घसातज्ज्ञ, शल्यचिकित्सक आणि दंतशल्य चिकित्सक डॉक्टरांचा समावेश आहे. सदर डॉक्टरांच्या नेमणुका करार पद्धतीने ठोक मानधनावर करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी मांडला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर डॉक्टरांच्या नेमणुका महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत.