शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील माणूस उद्योजक व्हावा !

By admin | Updated: February 5, 2016 02:54 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही.

नांदगाव : आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही. यासाठीच बेरोजगार तरुण स्वत:चा उद्योग प्रस्थापित करुन स्वत:च्या पायावर उभा राहावा, अशी इच्छा आहे. मंगेश दांडेकर मित्र मंडळ व सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ फेबु्रवारी रोजी उद्योजक कार्यशाळा आयोजित केली असून कोकणातील माणूस उद्योजक बनवा, अशी आपली धारणा असल्याचे प्रतिपादन मित्र मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी केले.मंगेश दांडेकर मित्र मंडळ व सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ फेबु्रवारी दरबार हॉल पटांगणावर ‘उद्योजक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक नितीन पवार, पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर, मजगाव उपसरपंच योगेन्द्र गोयजी, इम्तीयाज मलबारी, आदेश भोईर, मुग्धा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दांडेकर म्हणाले की, या उद्योजक मेळाव्यास सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबईचे संस्थापक सतीश परब हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत कृषी पर्यटन, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, शेळी पालन, मत्स्यव्यवस्था, नारळ सुपारी आदी व्यवसायांवर बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त ऐकण्यासाठी नसून अमलात आणण्यासाठी आहे. भविष्याची वाटचाल यशस्वी करण्यासाठी ही कार्यशाळा तरुणांना उपयोगी ठरेल असा विश्वास दांडेकर यांनी व्यक्त केला.यावेळी नगरसेवक नितीन पवार म्हणाले, उद्योजक कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांकडून कोणतीही प्रवेश फी घेण्यात येणार नाही. कार्यशाळेत सहभागासाठी कोणत्याही शिक्षणाची अट ठेवण्यात आलेली नाही. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. (वार्ताहर)