शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

स्वच्छ भारत अभियानासाठी पेण पालिका सज्ज

By admin | Updated: October 5, 2015 00:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला एक वर्ष झाले असून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हे स्वच्छता अभियान पूर्ण करुन भारत

पेण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला एक वर्ष झाले असून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हे स्वच्छता अभियान पूर्ण करुन भारत स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्याचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यासाठी पेण नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत पेण पालकेने वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून केंद्र व राज्य शासनाच्या १२ हजार आर्थिक अनुदानात पालिका प्रशासनाने नगरपालिका फंडातून तीन हजार रुपये तर १४ व्या वित्त आयोगातून पाच हजार रुपये असे आठ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करुन शौचालय बांधणीसाठी २० हजार रुपये मंजूर करणारी पेण पालिका ‘क’ वर्ग नगर पालिकेत अग्रणी ठरली आहे. शौचालय बांधणीसाठी आलेल्या २०६ अर्जांपैकी पहिल्या टप्प्यातील ८८ लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ही रक्कम पालिका प्रशासनाने वर्ग केली असून या लाभार्थीना शौचालय बांधणीचे मंजुरी पत्रकाचे वाटप नगराध्यक्षा प्रितम पाटील व गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.२५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर २०१५ पर्यंत १६ दिवस हे अभियान राबविण्याचा कार्यक्रम सुरु आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पेण नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील व आरोग्य अधिकारी दयानंद गावंड यांनी शनिवारी पेण नगरप्रशासनाच्या ९ शाळांमधील ३५० शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता विषयक जनजागृतीची रॅली पेण शहरात काढली. या वेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छ शहर, सुंदर शहर, आरोग्यदायी शहरासाठी या स्वच्छता अभियानात नागरिकांनी घर, कॉलनी, परिसरात स्वच्छतेसाठी दक्षता घ्यावी असा संदेश देण्यात आला. शहरातून तब्बल दोन तास या विद्यार्थ्यांनी घोषणाद्वारे चांगली जनजागृती केली. यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांनी पुढे येवून आपला विभाग व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा घंटागाडीमध्ये वेळेप्रमाणे टाकावा, गटारांमध्ये कचरा टाकू नये. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्या काही तक्रारी असतील तर त्याबाबत माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जीवन पाटील यांनी केले.या अभियाना अंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या शिवाय स्वयंसेवी संस्थांद्वारे स्वच्छता उपक्रमावर भर देणार असल्याची माहिती पेण पालिका सूत्रांनी दिली. (वार्ताहर)