शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट चालविल्याने अल्पवयीन मुलास दंड, रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 05:53 IST

घणसोली परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे रिक्षा पळवल्या जात असून त्यातून छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत.

नवी मुंबई : घणसोली रेल्वेस्थानक व डीमार्ट परिसरात रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीवर कारवाईच्या उद्देशाने आरटीओने सोमवारी विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये रिक्षाचालकांसह नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. यावेळी एक अल्पवयीन बुलेटचालक आरटीओ पथकाच्या हाती लागला. नियम पायदळी तुडवून तो पथकासमोरून बुलेट घेऊन चालला होता. त्याला १४ हजार रुपयांचा दंड आकारल्याने त्याच्या पालकांना बुलेट चालवायला देणे चांगलेच महागात पडले.

घणसोली परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे रिक्षा पळवल्या जात असून त्यातून छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. या रिक्षाचालकांमध्ये बहुतांश तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून चालकपरवाना किंवा बॅज नसतानाही काही जण भाड्याच्या रिक्षा चालवत आहेत. त्यातच स्टेशन परिसरात केवळ दोनशे मीटरच्या अंतरावर रस्त्यावरच तीन स्टॅन्ड तयार झाले आहेत. यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता रिक्षांनी व्यापला जात आहे. अशा वेळी इतर वाहनांसाठी अडथळा होत असून त्यातून वादाचे प्रकार घडत आहेत. या रिक्षाचालकांना बाजूला होण्यास किंवा शिस्तीने चालण्याचा सल्ला दिल्यास त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. 

रिक्षाचालकांकडे बॅज, गणवेश नाहीया रिक्षाचालकांकडे गणवेश अथवा बॅज कधीच दिसत नाही. तर काही रिक्षा या भंगार अवस्थेतल्या दिसत असून त्यांचे नंबरदेखील अस्पष्ट झालेले आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा गुन्हा करून या रिक्षाचालकांनी पळ काढल्यास शोधण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शिस्तीत व नियमाने व्यवसाय करणाऱ्यांनाच रस्त्यावर रिक्षा चालवू देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या निर्देशानुसार त्यांच्या पथकाने घणसोली स्थानकाबाहेर व डीमार्ट बाहेर कारवाई केली. त्यामध्ये बहुतांश रिक्षाचालकांकडे कागदपत्रे आढळली नाहीत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई