शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत रक्कम भरण्याची मुदत संपली; सिडकोच्या विविध गृहप्रकल्पातील सदनिकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:22 IST

सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली.

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यामुळे सोमवारी अखेरच्या दिवशी पैसे भरण्यासाठी ग्राहकांनी सिडकोच्या संबंधित कार्यालयात गर्दी केली होती.विशेष म्हणजे डिफॉल्डर ठरलेल्या ग्राहकांसाठी ही अंतिम मुदत होती. त्यामुळे या मुदतीत ज्यांनी पैशाचा भरणा केला नाही, त्यांच्या घराचे वाटप रद्द करण्यात येणार आहे.सिडकोच्या माध्यमातून मागील दहा वर्षांत विविध नोडमध्ये विविध गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. यात विशेषत: स्वप्नपूर्ती, उन्नती, व्हॅलीशिल्प तसेच खारघर येथील केएच-१ व केएच-२ प्रकारातील घरांचा समावेश आहे. या गृहप्रकल्पात यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना विहित मुदतीत घराचे पैसे भरणे बंधनकारक असते. परंतु अनेक ग्राहकांनी या निर्धारित वेळेत पैसे न भरल्याने सिडकोने त्यांना डिफॉल्डर म्हणून घोषित केले होते. सिडकोच्या माहितीनुसार अशाप्रकारचे २५0 ग्राहक आहेत. या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने या घरांचे करायचे काय, असा प्रश्न सिडकोला सतावत होता. अखेर सिडकोच्या संचालक मंडळाने या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी १ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली. ही अखेरची मुदत असल्याने ग्राहकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले होते. ही मुदत सोमवारी संपली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेरच्या दिवशी ग्राहकांनी पैसे भरण्यासाठी पणन विभागात गर्दी केली होती. त्यामुळे कार्यालय संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, विविध कारणांमुळे घरांचे पैसे भरू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना ही अखेरची संधी होती. त्यानुसार ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ज्या ग्राहकांनी या मुदतीत पैशाचा भरणा केला नाही, त्यांचे वाटपपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या पणन विभाग (२) चे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.पैसे न भरल्यास वाटपपत्र रद्द करण्याची कारवाईविविध कारणांमुळे घरांचे पैसे भरू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना ही अखेरची संधी होती. ज्यांंनी मुदतीत पैशाचा भरणा केला नाही, त्यांचे वाटपपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या पणन विभाग (२) चे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको