शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये भरा; एमएमआरडीएकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर

By नारायण जाधव | Updated: December 25, 2022 06:00 IST

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१.८ किमीच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून रात्रंदिवस सुरू आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१.८ किमीच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून रात्रंदिवस सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा चंग प्राधिकरणाने बांधला आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांडून दोन टप्प्यात टोल  आकारण्यात येणार आहे. कारसाठी २४० रुपये तर मल्टी ॲक्सल वाहनांसाठी ७८० रुपये टोल असणार आहे. 

टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. पुलावरून २०२२ मध्ये ३९,३०० वाहने तर २०४२ पर्यंत ५५ हजार वाहने दरराेज धावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

वाशी पुलावरील भार कमी

शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक सुरू झाल्यानंतर सध्याच्या वाशी खाडी पुलावरील मोठा भार कमी होणार आहे.  सुरुवातीला तो १० टक्के तर २,०३२ ती १६ टक्क्यांहून अधिक भार कमी होईल, असा अंदाज आहे.

प्रत्येक किमीवर सीसीटीव्ही

सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक किमी अंतरावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय तत्काळ कॉल बॉक्स लावण्यात येणार आहेत. रोख आणि आटोमॅटिक दोन्ही पद्धतीने टोल वसूल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार असून ते एका ऑप्टिकल फायबर केबलद्वारे नियंत्रण कक्षास जोडण्यात येणार आहे.

३९,३०० वाहने २०२२ मध्ये जी धावतील

२४,१०० कार२,७०० टॅक्सी२,७०० बस २,२०० छोटी अवजड ३,००० मोठी अवजड४,६०० मल्टी ॲक्सल 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई