शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

सेनेच्या प्रचाराची धुरा पाटील यांच्या खांद्यावर

By admin | Updated: January 13, 2017 06:08 IST

मागील काही वर्षांपासून शिवसेनेत असूनही प्रकृती ठीक नसल्याने पक्ष कार्यात सक्रिय सहभाग

पाली : मागील काही वर्षांपासून शिवसेनेत असूनही प्रकृती ठीक नसल्याने पक्ष कार्यात सक्रिय सहभाग घेऊ न शकलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांना या निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री अंनत गीते यांच्या आदेशाने सर्व जुन्या व नवीन शिवसैनिकांना सोबत घेऊन पेण-सुधागड मतदार संघाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी विष्णू पाटील यांच्या खांद्यावर देऊन आम्ही निवडणुका लढविणार व सुधागड पंचायत समितीवर तसेच शिवतीर्थावर भगवा फडकविणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले. भविष्यात विष्णू पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूचित केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरु झाली असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी १२ जानेवारी रोजी शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.याप्रसंगी सुधागड जिल्हापरिषदेचे पाली गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत, परळी गटाचे रवींद्र देशमुख, तसेच नाडसूर पंचायत समिती गणाचे उमेदवार सुषमा कदम, जांभूळपाडा गणाचे नंदू सुतार, परळी गणाचे उज्ज्वला देसाई, यांची शिवसेनेची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याचप्रमाणे पाली पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली जागा आमचे मित्रपक्ष यांना सोडण्यात आलेली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची पहिली प्रचार सभा प्रचारप्रमुख विष्णू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानखोरे येथे १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे सांगितले. या वेळी ताडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किसन धायगुडे, आप्पा खताळ, महादू खताळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमधून शिवसेनेत प्रवेश केला. या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, नरेश गावंड आदी उपस्थित होते.