शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक शांततेत पार पाडा; दत्तात्रेय नवले यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:22 IST

पनवेलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक

पनवेल : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सोमवारी पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने विविध सूचना करण्यात आल्या.या बैठकीला पोलीस, महसूल अधिकारी, पालिका अधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. २१ आॅक्टोबरला विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. तर २४ आॅक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यादृष्टीने मतदान केंद्रांवर कोणती खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केल्या. तसेच प्रचाराच्या अनुषंगाने घ्यावयाची परवानगी याबाबत पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमधील बिघाडाची माहिती मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकाºयाला द्यावी असे सांगून ईव्हीएमबाबत विनाकारण अफवा पसरविणाºया घटकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा नवले यांनी दिला. या वेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परवानगींचा ससेमिरा थांबविण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारची परवानगी मिळावी याकरिता एक खिडकी योजना राबविण्याची विनंती केली.पनवेल विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. या वेळी पोलिसांनीदेखील काही मुद्दे उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कळंबोलीत मतदान केंद्रांवर बीएलओंवर पक्षपातीपणाचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला होता. या वेळी मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला होता, असे वाद निर्माण होणार नाहीत याकरिता बीएलओंना सूचना देण्याची विनंती करण्यात आली. कळंबोलीचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी बीएलओंना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.पनवेल मतदारसंघ माहितीमतदार संख्या - ५ लाख ५४ हजार ४६४पुरुष मतदार - २ लाख ९७ हजार २७२स्त्री मतदार - २ लाख ९७ हजार २७२एकूण मतदान केंद्रे - ५६७तळमजल्यावरील केंद्रे - ५२०पहिल्या मजल्यावरील केंद्रे - ५४दुसºया मजल्यावरील केंद्रे - २सर्वांत जास्त मतदार असलेली केंद्रे - १५७ खारघर (१७५२ मतदार ) रेडक्लिफ शाळासर्वांत कमी मतदार असलेली मतदार केंदे्र -खैरवाडी १६३ (३०५ मतदार)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019