शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्यालयात पार्टी?; कँटीनसमोरील आवारात बीअरचे रिकामे टिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:32 IST

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बीअरचे रिकामे टिन आढळल्याने मुख्यालयात ३१ डिसेंबरची पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने याआधीही मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी सापडण्याचा प्रकार घडला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बीअरचे रिकामे टिन आढळल्याने मुख्यालयात ३१ डिसेंबरची पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने याआधीही मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी सापडण्याचा प्रकार घडला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत ही आयकॉनिक इमारत म्हणून ओळखली जाते. मुख्यालय पाहण्यासाठी अनेक नागरिक या इमारतीमध्ये येतात. खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या या इमारतीमध्ये सुरक्षा यंत्रणा तकलादू आहे. मुख्यालयात आलेल्या वाहनांची कोणतीही तपासणी अथवा विचारपूस न करता केवळ वाहनांचा क्र मांक नोंद केला जातो आणि वाहने मुख्यालयाच्या आवारात सोडली जातात. प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी करणारी अद्ययावत यंत्रणा बसविण्यातच आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही वाहनांना सहज प्रवेश मिळविता येतो, तसेच वाहने पार्किंग केल्यावर तळमजल्यावरून जिना किंवा लिफ्टने मुख्यालयातील कोणत्याही मजल्यावर कोणत्याही तपासणीशिवाय प्रवेश मिळत आहे, त्यामुळे मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या महिन्यात पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी आढळली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने त्याची तपासणी केली असता सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये फक्त लाइव्ह दिसत असून, रेकॉर्डिंग होत नसल्याचे समोर आले आहे. या घटनेननंतर आता पत्रकार कक्षातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे रेकॉर्डिंग सुरू करण्यात आले आहे. बुधवार, २ जानेवारी रोजी पालिका मुख्यालयातील कँटीनसमोरील बंद असलेल्या आपत्कालीन दरवाजासमोर बीअरचा टिन आढळला आहे, यामुळे ३१ डिसेंबरची पार्टीदेखील मुख्यालयात साजरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयात धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे हे मुख्यालयाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असून, महापालिका प्रशासनाने मुख्यालय परिसरात अद्ययावत सुरक्षा यंत्रणा राबविण्याची मागणी केली जात आहे.महापालिकेच्या मुख्यालयात अशा गोष्टी आढळणे गंभीर बाब असून, कँटीन समोर आढळल्याने कँटीनचालक आणि मुख्यालयाचे सुरक्षारक्षक यांना सूचना देण्यात येतील.- रवींद्र पाटील,अतिरिक्त आयुक्त

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई