शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पार्किंगची समस्या गंभीर; अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बेकायदा तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:50 IST

शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगअभावी वाटेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.वाहतूककोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातच वाहने पार्क करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याला नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता; परंतु त्यांची बदली होताच पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंग सुरू झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. कोपरी गावालगत पामबीच मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चक्क नो पार्किंगमध्ये वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. घणसोली रेल्वेस्थानक, बेलापूर-सीबीडी प्रभात सेंटर, करावे गाव महापालिका तलाव, वाशी सागर विहार चौपाटी, फोर्टीस हॉस्पिटलसमोरील रस्ता, जुहूगाव येथील गावदेवी मैदान, सीवूड रेल्वेस्टेशन, घणसोली आणि तुर्भे महापालिका विभाग कार्यालयाचा परिसर, नेरुळ रेल्वेस्टेशन, तुर्भे येथील जनता मार्केटजवळील उड्डाणपुलाच्या खालील परिसर, शिरवणे गावातील महापालिका शाळेचे मैदान, घणसोली डी-मार्ट परिसर, जुईनगर डी-मार्ट, कोपरखैरणे वैकुंठधाम स्मशानभूमी, तीन टाकी, वाशी गावातील भुयारी मार्गाबाहेर, ऐरोली सेंट झेवियर्स स्कूल, वाशी साईनाथ हायस्कूल, महापालिका प्रथम संदर्भ रु ग्णालय, रबाळे पोलीस स्टेशन परिसर, घणसोली रिलायन्स कंपनी समोरील सर्व्हिस रोड, तसेच कोपरखैरणे बालाजी टॉवर समोरील रस्त्यावरदोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग दिसून येते.या बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक नियोजन ढासळले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. अनेक ठिकाणी थेट पदपथावर वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.अनेक विभागांत रस्त्यांच्या कडेला ट्रक, कंटेनर व शाळेच्या बस उभ्या केलेल्या दिसून येतात. त्याकडे संबंधित विभागाचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.पे अ‍ॅण्ड पार्क : बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली आणि कोपरखैरणे विभागात एकूण १२ ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क आहे, तर बेलापूर ते ऐरोली दरम्यान एकूण५२ वाहनतळ असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.पार्किंगची प्रमुख समस्या आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येनुसार सिडको आणि महापालिकेने वाहन पार्किंगचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रसंगी मल्टिलेवट अर्थात बहुमजली पार्किंग तळाचाही प्रयोग करणे आवश्यक आहे, असे असले तरी वाहनधारकांनी उपलब्ध सुविधांचा वापर करताना नियोजनाला तडा जाणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.- नितीन पवार,पोलीस उपायुक्त,वाहतूक शाखा

टॅग्स :Parkingपार्किंग