शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचे शांतीनिकेतन शाळेविरोधात आंदोलन, फीवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:44 IST

शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.

पनवेल : शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.शांतीनिकेतन शाळेत विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच लायब्ररी, इव्हेंट, अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शाळेचे कपडे व पुस्तके कामोठे व खारघर येथील दुकानातूनच घ्यावे यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कमी किमतीत मिळणारी पुस्तके व कपडे शाळा प्रशासनाकडून नाकारली जात असल्याचे श्याम हंबर्डे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी तक्र ार दाखल केली आहे. मात्र तरी देखील शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी शिक्षणमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अलिबाग आणि पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाने २१ फेब्रुवारी २0१८ रोजी एन.सी.इ.आर.टी. कडून प्रकाशित झालेली अभ्यासक्र माची पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्याबाबत बंधनकारक करून खासगी प्रकाशनाची पुस्तके देण्यात येऊ नयेत, असे कळविले आहे. शाळेमधील पात्र मुख्याध्यापक आणि पात्र शिक्षक यांची नियुक्ती ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये याबाबत सांगण्यात आले आहे. आणि याबाबतची प्रत मा.शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनाही पाठविण्यात आल्याचे पत्र पालकांकडून सादर करण्यात आले असले तरी शांतीनिकेतन शाळेतील शिक्षकांची नियुक्ती चुकीची असल्याचाही आरोप यावेळी पालकांमार्फत करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या जागेत भाड्याने देण्यात आलेल्या अपना बँकेबाबत पालकांनी आवाज उठविताना सांगितले की, शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची योग्य काळजी न घेता आणि शाळा दुरु स्तीच्या नावाखाली पैसे मागत असते.गतवर्षी पालकांची सभा घेऊन ३५ लाख रु पये शाळेला गरज असल्याचे सांगून पालकांवर भर देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केल्यामुळे संतप्त पालकांनी मात्र याबाबत व्यवस्थापनाकडे गेल्या काही वर्षातील हिशोब मागितला असता शाळा व्यवस्थापनाला आर्थिक गळती लागल्याचे समोर आले. त्यामुळे पालकांना अखेर आपल्या पाल्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत.याविषयी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.>खिडक्यांना ग्रील बसवावेशांतीनिकेतन शाळेच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील लावलेले नाहीत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळंबोली येथील सेक्टर ४ मधील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विघ्नेश सतीश साळुंखे ( १२) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून जुलै २0१५ मध्ये उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुर्घटना होण्यापूर्वीच ग्रील बसविण्यात यावेत अशी सूचना पालकांनी केली आहे.