शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे पनवेलचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: March 2, 2016 02:23 IST

विकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर हवेतील प्रदूषणही वाढले आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईविकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर हवेतील प्रदूषणही वाढले आहे. पूर्ण वर्षभर धूळ व धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली नाहीत तर शहरवासीयांना श्वसनाचे व हृदयाशी संबंधित आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना क्षेत्रामुळे पनवेल देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे. ग्रामीण परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. परंतु शहराची रचना करताना फक्त इमारतींची उभारणी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरण रक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास सुरू झाला आहे. गाढी नदीचे नाल्यात रूपांतर होवू लागले आहे. मँग्रोजचे जंगल नष्ट केले जात आहे. लोकवस्तीच्या प्रमाणात उद्यानांसाठी भूखंड राखीव ठेवलेले नाहीत. वाहनांची संख्या दहा वर्षांत जवळपास तिप्पट झाली आहे. या सर्वांमुळे हवेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण विभागाने २०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये हवेतील सल्फरडाय आॅक्साईड व नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण नियंत्रणात असले तरी रेस्पीरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलर मॅटर (आरएसपीएम) चे प्रमाण मात्र मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. धुलीकण हे सूक्ष्मकण व ऐरोसोल यांचे क्लिष्ट मिश्रण असून धुलीकण प्रदूषण या नावानेही ओळखले जातात. नायट्रेड व सल्फेटसारखी आम्ल, सेंद्रिय रसायने, धातू व धुलीकण यासारख्या घटकांचा समावेश असणाऱ्या घटकांपासून धुलीकणाची निर्मिती होत असते. १० मायक्रॉन व त्याहीपेक्षा कमी व्यास असलेले धुलीकण घसा व नाकामार्फत फुप्फुसात प्रवेश करू शकतात. श्वासामार्फत धुलीकण शरीरात गेल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम हृदय व फुप्फुसांवर होत असतो. हवेतील आरएसपीएम १० ची मात्रा ८० ते १०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर असणे आवश्यक आहे. परंतु पनवेल शहरात हेच प्रमाण वर्षभरामध्ये जवळपास १३८ एवढे असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय हवेतील एसपीएमचे प्रमाण निवासी क्षेत्रामध्ये २०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. परंतु हे प्रमाणही सरासरी २२८ असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळून आले. शहराचा विकास करताना रहिवाशांच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखला नाही तर भविष्यात शहरवासीयांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सिडकोने साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यावरण विभागाच्या अहवालाची माहिती व त्यावरील उपाययोजना केल्याची माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाही.पर्यावरण अहवाल धूळखातनगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल तयार करत असते. या अहवालामध्ये हवेतील धूळ व धुलीकणांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण असूनही ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. शहरवासीयांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळावी असे कोणालाच वाटत नसल्याचे चित्र आहे. ज्यांच्यामुळे प्रदूषण वाढत आहे त्यांच्यावरही काहीच कारवाई होत नसल्याने शहरवासीयांचे आरोग्य रामभरोसे असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.