शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर ताशेरे, सत्ताधारी-विरोधक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:55 IST

प्रशासनाकडून पनवेल शहर महापालिका क्षेत्रासाठी जे निर्णय घेतले जातात, विकासकामांसाठी ज्या तदतुदी केल्या जातात, निधी मंजूर केला जातो, निर्णय प्रक्रियेत सत्ताधाºयांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर केला.

पनवेल : प्रशासनाकडून पनवेल शहर महापालिका क्षेत्रासाठी जे निर्णय घेतले जातात, विकासकामांसाठी ज्या तदतुदी केल्या जातात, निधी मंजूर केला जातो, निर्णय प्रक्रियेत सत्ताधाºयांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर केला. त्यामुळे शनिवारी फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण महासभाही गोंधळात पार पडली.पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नियोजित चीन दौºयामुळे महासभेत प्रभारी आयुक्तपद संध्या बावनकुळे यांनी सांभाळले. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत यांच्या उपस्थितीत महासभेला सकाळी सुरु वात झाली. नगरसेवक नितीन पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने नुकतीच सरकारी कार्यालयात प्लास्टिकवर बंदी घातली असताना महासभेत प्लास्टिकच्या बाटल्यांमधून कसे पाणी देता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सभागृहात जो माणूस जास्त बोलतो त्याची चौकशी आयुक्तांद्वारे केली जात असल्याचा आरोप या वेळी जगदिश गायकवाड यांनी केला. वर्षभरात केवळ फेरीवाल्यांवरच कारवाई झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नगरसेवक नितीन पाटील यांनी केला. स्वच्छ भारत अभियानाबाबत पालिकेमार्फत विविध कार्यक्र म राबवत आहेत. त्या कार्यक्र माच्या आयोजनात नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.गावठाणातीलरखडलेल्या परवानग्या२९ गावांच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न नगरसेवक गोपाळ भगत यांनी उपस्थित केला. सिटी सर्व्हे झाला नसल्यामुळे गावठाणात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर बोलताना नगरसेवक अरविंद म्हात्रे, जगदिश गायकवाड यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. घरपट्टीच्या आधारावर बांधकाम ग्राह्य धरणे आवश्यक आहे. यासंदर्भात न्यायालयात घरपट्टी ग्राह्य धरली जाते, तर पालिका ती का नाही ग्राह्य धरत, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.१२२ इमारतींनाना-हरकत प्रमाणपत्रआयुक्त शिंदे यांनी, सिडकोने रोखून धरलेल्या १२२ इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिले. याबाबत नगरसेवक जगदिश गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर शहर अभियंते कटेकर यांना सभागृहात उत्तर देण्याचे आदेश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिले. त्यानंतर कटेकर यांनी सभागृहात उपस्थित नगरसेवकांना यासंदर्भात माहिती दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई