शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांचे पाणी संकट टळल;देहरंग धरण ओवरफ्लो

By वैभव गायकर | Updated: June 29, 2024 16:07 IST

पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे.

वैभव गायकर

पनवेल: पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे.विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातुन बाहेर जाऊ लागले असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. पनवेल महानगरपालिकेने यावर्षी पाणीपुरवठ्याचे उत्तम नियोजन केले होते.पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी याबाबत सूक्ष्म पाण्याचे नियोजन करीत पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये विभाग निहाय आठवड्यात एक दिवस पाणी कपात केली होती.यामुळे पावल्यापर्यंत धरणात पाणीसाठा कायम होता.

माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल पालिकेच्या मालकीची 277 हेक्टर जमीन असून त्यापैकी 125 हेक्टरवर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगरपरिषद म्हणून पनवेलचे नावलौकिक होते.या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिमाण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रति दिन 16 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे.याकरिता एमआयडीसी आणि एमजेपी कडून प्रत्येक 16 एमएलडी पाणी पालिका विकत घेते.मे अखेर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरिता पूर्णत: या दोन विभागांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो आणि कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. गेल्या तीन दिवसांपासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि धरणाने सांडवा पातळी गाठली.  देहरंग धरण पूर्णक्षमतेने भरले असल्याने पनवेल शहराचे पाणी संकट टळले आहे.त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीकपात बंद केली असुन धरणातून नियमित 16 एमएलडी पाणी घेण्याचे नियोजन केले आहे.- विलास चव्हाण (पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महानगरपालिका )