शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

पनवेलकरांना आवडतो एक, फॅन्सी नंबरसाठी मोजतात चार लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:02 IST

पनवेल आरटीओच्या तिजोरीत कोटींचे उत्पन्न, मागणीत वाढ

- वैभव गायकरपनवेल: वाहनांसाठी आवडीची नंबरप्लेट्स ही सध्या एक नवीन फॅशन झाली आहे. फॅन्सी नंबरच्या शुल्कात सात वर्षांपूर्वी परिवहन विभागातर्फे तिप्पट वाढ करण्यात आली. आता पुन्हा हे शुल्क वाढविले जाणार आहे. तरीही आवडीच्या नंबरसाठी वाहनचालक आग्रही आहेत.. पनवेल आरटीओला व्हीआयपी नंबरमुळे कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याचे दिसून येत आहे. २०१९-२० वर्षात पनवेल आरटीओला आवडीच्या क्रमांकासाठी सुमारे ३ कोटी २१ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. या वर्षी कोरोनामुळे निम्मे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेले असले, तरी २०२०-२१ मध्ये पनवेल आरटीओला नोव्हेंबर महिन्यापर्यंत १ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. पनवेल आरटीओ कार्यालयांतर्गत पनवेल, उरण, खालापूर आदी तालुक्यांचा समावेश आहे. सन २०१९-२० मध्ये ३७१९ जणांनी आवडते क्रमांक घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे अर्ज केल्याचे पाहावयास मिळाले आहे, तर सन २०२०-२१ मध्ये २,०८९ जणांनी आवडते क्रमांक घेतले आहेत. याकरिता आरटीओमार्फत आकारली जाणारी अतिरिक्त फी भरली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी प्रमाणात गाड्यांची विक्री झाली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री झाली असून, व्हीआयपी नंबरची मागणी वाढल्याचे पनवेल आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. व्हीआयपी नंबरच्या माध्यमातून आरटीओच्या उत्पन्नात चांगली भर पडत आहे. या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न व्हीआयपी नंबरमधून मिळाले आहेत. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यावर वाहन घेण्याचा काळ वाढल्याचे दिसून आले.  -अनिल पाटील , (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल)प्रतिष्ठा जपण्यासाठी लाखो रुपये मोजायची तयारीव्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये मोजायची तयारी असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये १, १०, १०० क्रमांकासह अनेक व्हीआयपी क्रमांकांचा समावेश आहे. कुटुंबातील सर्व गाड्यांना एकच क्रमांक घेण्याचा नवीन ट्रेंडही पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. व्हीआयपी क्रमांकाच्या या ट्रेंडमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.या तीन नंबर्सना सर्वाधिक दर०१- ४,००,००० (रुपये)०९- १,५०,००० (रुपये)१११- ७०,००० (रुपये)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस