शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाण्यामुळे पनवेलकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 02:22 IST

आंदोलनाचा इशारा : एमजेपीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

पनवेल : नवीन पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे धो धो पाऊस सुरू असताना नवीन पनवेलमधील रहिवाशांचा घसा अद्याप कोरडाच आहे. एमजेपीच्या माध्यमातून या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एमजेपीच्या माध्यमातून सुरळीत पाणीपुरवठा केला नसल्याने भाजप शिष्टमंडळाने सोमवारी एमजेपी अधिकाºयांची भेट घेतली. बैठकीत अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात न आल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पनवेल महापालिकेत भाजप सत्तेवर आहे. पाणीटंचाईमुळे सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पनवेलमध्ये जोरदार अतिवृष्टी असताना नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने भाजपने एमजेपीच्या अधिकाºयांना ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन पनवेलमधील नागारिकांनी सोमवारी सकाळी स्थानिक नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना पाण्याची समस्या सांगितली. यानंतर भुजबळ यांच्यासह सर्व जण सिडकोच्या कार्यालयात गेले. तेथील टाकीत पाणी आहे; पण जनरेटर दोन वर्षे बंद असल्याने पाणीपुरवठा करता येत नसल्याचे समजले. त्यामुळे जनरेटर त्वरित सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.नवीन पनवेल सेक्टर १५ मधील पी ६ वसाहतीत गेला आठवडाभर पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वसाहतीत सिडकोने पाण्याच्या भूमिगत टाक्या न बांधल्याने बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यापर्यंत पाणी चढण्यासाठी पाण्याचा दाब जास्त असावा लागतो. मात्र, सध्या तो नसल्याने येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यांना टँकरनेही पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. एमजेपीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला असून या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे आदीसह रहिवासी उपस्थित होते. 

टॅग्स :panvelपनवेलWaterपाणी