शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच

By admin | Updated: March 7, 2015 22:29 IST

शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे.

पनवेल : शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. एक हजार मुलांपाठीमागे ९०० मुली जन्माला येत असल्याचे उघड झाले आहे.ग्रामीण भागाबरोबर शहरातही तीच परिस्थिती असून यासंदर्भात नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘बेटी बचाओ’साठी काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. पनवेल परिसरात विविध विकास प्रकल्प आले आहेत. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने याठिकाणची लोकसंख्या दिवसेन्दिवस वाढतच आहे. नोकरदार महिलांची संख्याही अधिक असून मुलींचा जन्मदर मात्र कमी असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मध्यंतरी केलेल्या सर्व्हेनुसार, राज्यात ६ हजार ९३० सोनोग्राफी मशिन होत्या. त्यापैकी दीड हजार रायगड आणि नवी मुंबई परिसरात होत्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मशिनच्या संख्या जास्त, त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्भनिदान कायदा देखरेख समितीच्या अध्यक्षा वर्षा देशपांडे यांनी स्ट्रिंग आॅपरेशन करून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठवले होते. मात्र नवी मुंबई आणि रायगड परिसरात अशाप्रकारे धाडसत्र फारशी झालेली नाहीत. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफी मशीनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती व्यवस्थित न ठेवणे त्यामुळे संशयाची सुई असलेल्या दोन डॉक्टरांना पनवेल न्यायालयाने सजाही ठोठावली. एका संस्थेच्या वतीने जिल्ह्यात लेक लाडकी अभियान राबवून एक वा दोन मुली असलेल्या पालकांचा सन्मान केला होता. शिवाय सखी तुझ्यासाठी या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत जनजागृती करण्यात आली, मात्र संस्थेचे संस्थापक अभिजित माळी यांच्या पश्चात हे काम मागे पडले. २०११ साली या परिसरातील जनगणनेनुसार महिलांचे प्रमाण एक हजारी पुरुषामागे ९०० च्याही खाली गेले आहे. २००८ साली हे प्रमाण ९४१ इतके होते. आता ७६ ने कमी होऊन ८६५ वर आले आहे. पनवेल तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका ६ महिने ते ६ वर्षे या वयोगटातील बालकांचा सर्व्हे करतात. सध्या प्रकल्प-१ मध्ये २० हजार बालके आहेत. त्यापैकी १०,५०० पेक्षा जास्त मुले आहेत तर ९,५०० पेक्षा कमी मुली आहेत. पनवेल नगरपालिका हद्दीत पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा वसाहतींचा समावेश होतो. या भागात गेल्या वर्षी ५७७९ बालके जन्मली. त्यापैकी ३००७ मुले आणि २७७२ मुली आहेत. मुला-मुलींमधील ही तफावत अत्यंत चिंतादायक असल्याची प्रतिक्रि या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बामणे यांनी दिली. (प्रतिनिधी)पनवेलसारख्या शहरात मुलींचे जन्मदर कमी असणे ही शोकांतिका आहे. याकरिता नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. बेटी बचाओ या उपक्रमासाठी शासनाकडूनही विविध उपाययोजना राबविण्यात येत असून सुकन्या योजनेचा लाभ सर्व मुलींसाठी फायदेशीर आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. - निवेदिता श्रेयन्स, जनसंपर्क अधिकारी, पिल्लाई कॉलेज