पनवेल : देशातील स्मार्ट सिटीमध्ये लवकरच पनवेल महानगरपालिकेचा समावेश असेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर विचार मंच, नवीन पनवेल महिला मंडळ ,ज्येष्ठ नागरिक संघ, कर्नाटक संघ, तामीळ संघ, शीख व मुस्लिम समजातर्फेआयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी रविवारी व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, माजी उप नगराध्यक्ष संतोष सेट्टी, मंडळाचे अध्यक्ष किशोर चौथमल, सी.पी. प्रजापती, बीजेपीच्या रायगड अध्यक्षा कल्पना राऊत, तालुका चिटणीस अविनाश कोळी, शहर अध्यक्षा मुक्ता लोंढे, रेणुका अनासने, स्वप्ना माळी, स्वप्ना शेट्टी, आशा शेट्टी व खांदेशवर पोलीस निरीक्षक अमर देसाई उपस्थित होते.महानगरपालिकेमुळे सिडको वसाहतीतील तलावाचे सुशोभीकरण, राजीव गांधी मैदान यातील अडचणी दूर होतील. नवीन आयुक्त सुधकार शिंदे पनवेलकरांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
पनवेल देशातील स्मार्ट सिटी बनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 04:55 IST