शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरात पाणीप्रश्न गंभीर; मागणीपेक्षा कमी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:45 IST

जोपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येत नाही, तोपर्यंत मागणीप्रमाणे पाणी देणे अशक्य असल्याचे एमजेपीने सिडकोला लेखी कळवले आहे. त्यामुळे अगामी काळात पाण्याचा प्रश्न सुटेल, असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झालेले आहे.

कळंबोली : जोपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येत नाही, तोपर्यंत मागणीप्रमाणे पाणी देणे अशक्य असल्याचे एमजेपीने सिडकोला लेखी कळवले आहे. त्यामुळे अगामी काळात पाण्याचा प्रश्न सुटेल, असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झालेले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भोकपाडा ते पनवेल या दरम्यानची वाहिनी जुनाट झालेली आहे. अनेक ठिकाणी गळती लागल्याने जवळपास ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. वारंवार वाहिनी फुटत असल्याने सातत्याने शटडाउन घेतला जात आहे. यामुळे पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली आणि करंजाडे परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. एमजेपीची वाहिनी बदलण्याचा प्रस्ताव जुनाच आहे. मात्र, निधी आणि इतर तांत्रिक कारणामुळे वाहिन्या बदलण्यात येत नाहीत. मध्यंतरी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे बैठक झाली. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर कविता चौतमोल यांनी त्वरित निविदा प्रक्रि या करून कामाला सुरुवात करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार पाणीपुरवठामंत्र्यांनी आदेश दिले आहेत; परंतु या कामाला कमीत कमी तीन वर्षे तरी खर्ची पडणार आहेत. त्या दरम्यान रहिवाशांना पाणी द्यायचे तरी कुठून, असा प्रश्न सिडको आणि महापालिकेला पडला आहे.नवीन पनवेलमध्ये तर रोज तक्र ारींचा पाढा वाचत आहे. आता तर जीवन प्राधिकरणाने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्र दिले आहे. आमची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे कमीच पाणीपुरवठा केला जाईल, असा त्यामध्ये उल्लेख आहे.एमेजेपीकडून मुळातच कमी पाणी दिले जाते. त्यातून आम्ही नियोजन करतोय, आता तर त्यांनी पत्रसुद्धा दिले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही पर्यायी व्यवस्था सिडकोकडून करण्यात येत आहेत.- दिलीप बोकाडे,कार्यकारी अभियंता, सिडकोआम्ही सिडकोला पत्र दिले आहे ही वस्तुस्थिती आहे. जीर्ण झालेल्या वाहिन्या वारंवार फुटतात, त्यामुळे जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही. नवीन वाहिन्यांकरिता किमान तीन वर्षांचा कालावधीत अपेक्षित आहे.- सुरेंद्र दशोरे,उपअभियंता, एमजेपी

टॅग्स :Waterपाणी