शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:16 AM

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात आयुक्त शिंदे यांनी गुरु वारी पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.तुम्ही मग्रुरीने पालिकेचा कारभार हाकत आहात, हे कुठेतरी थांबायला हवे आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून तुम्हाला याबाबत कल्पना देऊनही तुमच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नसल्याने तुम्हाला संपविण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही. तुम्ही वारंवार नगरसेवकांच्या अधिकारांवर घाला घालत आहात. तुम्ही असेच वागलात तर मी तुमच्या चेहºयावर काळे फासेन, तुमच्या चारित्र्यावर डाग लावीन. आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लावलेली आहे. व्यवस्थित वागल्यास आम्ही हे सर्व थांबवू, अशी धमकी पत्रात आहे. तुम्ही ज्या नागरिकांना खूश करण्यासाठी हे सर्व पारदर्शक कारभार करता त्यांना मतदानावेळी आम्ही तीन हजार रुपये देऊन नगरसेवक म्हणून निवडून आलो. तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करू. आमच्या मर्जीतील कंत्राटदार पालिकेत नेमा, त्याला दरमहा आम्हाला भेटायला सांगा, तुम्ही पैसे खात नाही; पण आम्हाला लागतात, असेही पत्रात नमूद आहे.तुमच्यामुळेच हे अधिकारी नगरसेवकांशी मग्रुरीने वागत आहेत. स्वत:ला मुख्यमंत्री असल्याचे समजत आहेत. पालिकेतील उपायुक्त संध्या बावनकुळे व जमीर लेंगरेकर यांचाही उल्लेख पत्रात आहे. आयुक्त शिंदे यांनी पत्र सोमवारी प्राप्त झाल्याचे सांगितले. मी वैयक्तिक काम करीत नसून, जनतेचीच कामे करीत आहे. या पत्राला न घाबरता मी अजून जोमाने कामाला लागेन, असे शिंदे म्हणाले.भाजपा नगरसेवक, आयुक्त शिंदे यांच्यात वादमागील अनेक दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपा नगरसेवक व आयुक्त शिंदे यांच्यात वाद पेटला आहे. आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक खुलेआम करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात उघडपणे चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे पत्र पाठवणाºयांनी मुद्दामहून अनेक गोष्टी या पत्रात नमूद केल्या आहेत. यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्र ार केली आहे. २३ नोव्हेंबरला हे पत्र पनवेल महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई