शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 

By वैभव गायकर | Updated: April 18, 2025 19:15 IST

स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.   

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेलमहाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला सन्मानित करण्यात आले. बालेवाडी येथे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत दि.18 रोजी   झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वस्तिकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.   

पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार उमा खापरे, आमदार अमित बोरखे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे आदींची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये ती दररोज सहा तास खेळाचा सराव करीत असते. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. टेबल टेनिससाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वस्तिकाच्या या यशाचे संपूर्ण श्रेय जनार्दन शिक्षण प्रसारक संस्था,माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांना जात असल्याची प्रतिक्रिया संदीप घोष यांनी देत त्याबद्दल रामशेठ ठाकूर यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.

टॅग्स :panvelपनवेल