शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पनवेल मनपासमोर नालेसफाईचे आव्हान, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम धीम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 07:01 IST

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.

- वैभव गायकरपनवेल  - पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सर्व कामे वेळेत पूर्ण करताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागणार आहे.पनवेल शहरात पटेल मोहल्ला, उरण नाका, श्रेयस हॉस्पिटलजवळील नाला हे महत्त्वाचे नाले आहेत. या नाल्यातून पावसाचे पाणी खाडीला मिळत असते. सध्याच्या घडीला पनवेल शहरात पॉवर हाउस ते कच्छी मोहल्ला या नाल्याच्या सफाईचे काम पालिकेने सुरू केले आहे. उर्वरित ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. पनवेल शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. यामध्ये महाराष्ट्र बँक, मोमीन पाडा, टपाल नाका, मिडलक्लास सोसायटीचा काही भाग, कच्छी मोहल्ला, वाल्मीकी नगर तसेच पायोनियर परिसरात देखील पावसाळ्यात पाणी तुंबत असते. सद्यस्थितीमध्ये नालेसफाईचे काम ज्या गतीने सुरू होणे अपेक्षित आहे त्या गतीने दिसून येत नाही. आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेचे सर्व अधीक्षक यांना नालेसफाईचे काम मुदतपूर्व पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, तळोजा आदी नोडचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पूर्वाश्रमीच्या २९ ग्रामपंचायतीदेखील पालिकेत समाविष्ट आहेत. गावठाण परिसरामध्ये नालेसफाई सुरू झालेली नाही. खारघर शहरातील कोपरा पुलाजवळील मुख्य नाला, खारघर सेक्टर ८, २, १0 जवळील नाल्यांचे काम देखील सिडकोने अद्याप हाती घेतलेले नाही.पालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वा एजन्सी मनुष्यबळ पुरविण्याचे काम करत आहे. पालिका हद्दीतील प्रत्येक अधीक्षकाला १५ कर्मचारी , १ जेसीबी व १ डंपर आदींची पूर्तता करण्यात आलेली आहे. यंदा मान्सून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने पालिकेसमोर या सर्व नाल्यांची मुदतपूर्व सफाई करणे आव्हान असणार आहे.दरवर्षी पनवेलमध्ये पाणी पाणी होत असतेच यावर्षी चित्र बदलणार आहे का ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने २९ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने पालिकेमार्फत याकरिता नव्याने टेंडर प्रक्रि या काढता येणार नसल्याने आचारसंहितेमुळे ही कामे उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मान्सूनपूर्व नालेसफाई एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे गरजेचे असते. सर्व अधीक्षकांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मान्सूनपूर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्वी पालिका हद्दीतील सर्व कामे पूर्ण होतील.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगर पालिकामहत्त्वाचे नाले : पनवेल शहरात पटेल मोहल्ला नाला, उरण नाका, श्रेयस हॉस्पिटलजवळील हे नाले शहरातील मुख्य नाले आहेत. खारघर शहरात कोपरा पूल, सेक्टर १0, २, ८ तर खांदा वसाहत येथील बालभारती येथील नाला हा महत्त्वाचा नाला आहे. या नाल्यांची लवकरात लवकर साफसफाई होणे गरजेचे आहे.विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्रशहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या नियोजनाच्या अभावामुळे उद्भवली. तशीच अवस्था मान्सूनपूर्व कामात उद्भवणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ठेकेदारांमार्फत योग्यरीत्या कामे करून घ्यावीत, जेणेकरून शहरात पाणी साचण्याचे प्रकार होणार नाहीत. याकरिता विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे.पुष्पकनगरच्या भरावाचा फटका बसण्याची शक्यतानवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच भाग असलेल्या पुष्पक नगरच्या भरावाचे काम पूर्ण झाले असल्याने या परिसराची उंची दहा फुटापेक्षा जास्त वाढली आहे. विशेष म्हणजे या भरावामुळे पनवेल शहर खाली आले असल्याने या भरावाचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे. भरती आणि मुसळधार पाऊस एकाच वेळेला आल्यास मोहल्ला, कोळीवाडा, मिरची गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होईल अशी शक्यता माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी व्यक्त केला आहे. सिडको आणि पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील त्यांनी या अतिशय गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.२९ गावांत अद्याप कामाला सुरु वात नाहीपनवेल महानगर पालिका हद्दीत २३ ग्रामपंचायतीमधील २९ गावांचा समावेश आहे. याठिकाणच्या एकाही गावात अद्याप मान्सूनपूर्व नालेसफाई, गटार सफाईला सुरु वात केली गेली नाही. यापैकी अनेक गावे सिडको नोडलगत खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात याठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या