शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर, हिरानंदानी समूहाची टाऊनशिप

By नारायण जाधव | Updated: May 16, 2023 16:19 IST

प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक एकीकडे आकार घेत असताना दुसरीकडे देशातील  बांधकाम व्यावसायिकांनी नवी मुंबई-पनवेल परिसरात मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. याच अंतर्गत आता निरंजन हिरानंदानी समूहाच्या परसिपिना डेव्हलपर्स कंपनीने पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर वसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्तावित टाऊनशिपमध्ये परसिपिना डेव्हलपर्स कंपनी सुमारे १७,२३० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक मंजुरीसाठी राज्य परिवेश समितीने स्वीकारून तो आपल्या आगामी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेसमोर ठेवला आहे. परिवेश समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या शहराच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.

१७,२३० कोटींची गुंतवणूक-  परसिपिना डेव्हलपर्सच्या या टाऊनशिपमध्ये १७६.४० मीटर उंचीच्या १८२ इमारती बांधण्यात येणार आहेत. -  या इमारतींमध्ये ३३४५८ घरे बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे. -  सुमारे १८९४०१०  चौरस मीटर क्षेत्रावर ८२,८५,५९३.८१ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे.

३३ एमएलडी पाणी लागणारया टाऊनशिपसाठी ३३ एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, ही गरज महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण भागविणार असून सुरुवातीला बांधकाम सुरू असताना दररोज एक  एमएलडी पाणी देण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली असून तसे पत्रही  दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल