शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास

By नारायण जाधव | Updated: September 10, 2024 16:19 IST

महानगरातील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना

भालचंद्र जुमलेदार, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महामुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या डोंबारणीला प्रसवपीडा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटरसायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागण्याची घटना घडली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह महामुंबईतील नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर या महानगरांच्या वेशीवर असलेल्या महानगरातील आरोग्यसेवेचा भाेंगळ कारभार यामुळे उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आसूडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला सोमवारी रात्री प्रसवपिडा सुरू झाल्याने तिच्या नवऱ्याने माहितीतील आशा वर्करला फोन केला होता. त्यांनी ॲम्बुलन्ससाठी फोन नंबर दिला. परंतु, समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काेणताही पर्याय नसल्याने त्याने मोटरसायकला हातगाडी तीत त्यात आपल्या गरोदर पत्नीला बसवून आसुडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयामध्ये दाखल केले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

पनवेलसारख्या महानगरानजीकच्या शहरातच ही गंभीर घटना घडल्याने राज्यासह स्थानिक आरोग्यसेवेचे पितळ उघडे पडले आहे. यामुळे स्थानिकांना तीव्र संताप व्यक्त करून लाडकी बहिण सारखी प्रसिद्धीभीमुख योजना आणण्यापेक्षा महिलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली आहे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी