शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा 

By वैभव गायकर | Updated: October 27, 2023 15:11 IST

परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने  कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

पनवेल:पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे.  ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने  कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण  54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. येत्या 8, 9,10 11 डिसेंबरला 20 जिल्ह्यामध्ये विविध केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेबाबत काही  समाजकंटकाच्या माध्यमातून  व्हॉटस्अपद्वारे खोटे एसएमएस पाठविले जात आहे. अशा समाजकंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने पोलिस विभागास पत्र देण्यात येणार आहे. भरतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये. ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

केंद्रांवर बसवणार जामर - 20 जिल्ह्यामध्ये विविध केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस इत्यादी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नाही.

भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.- गणेश देशमुख (आयुक्त ,पनवेल महानगरपालिका) 

टॅग्स :panvelपनवेलexamपरीक्षा