शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार सोडला; प्रशांत रसाळ प्रभारी आयुक्त

By वैभव गायकर | Updated: March 20, 2024 16:22 IST

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.19 रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

वैभव गायकर,पनवेल :पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.19 रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 30 जुन पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या  अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना भारतीय निवडणूक आयोगाने शासनाला केल्या नंतर हि बदली करण्यात आली आहे.देशमुख यांच्यासह  आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.        निवडणुक आयोगाने शासनाला बदल्यावरून खडेबोल सुनावल्यानंतर रातोरात दि.19 रोजी मंगळवारी राज्यभरात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आयुक्त,अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या.यामध्ये पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा देखील समावेश असल्याने त्यांनी त्वरित या आदेशाचे पालन करीत बुधवारी दि.20 रोजी आपला पदभार सोडत अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांच्याकडे आपला आयुक्त पदाचा पदभार सोपवला.

पालिकेची विस्कट्लेली घडी बसविण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या आयुक्त गणेश देशमुख यांनी आकृतीबंध मंजुर करून ऐतिहासिक नोकरभरती केली.याव्यतिरिक्त महापौर बंगलो,आयुक्त बंगलो,मालमत्ता कर प्रणाली,जीएसटी अनुदान,माता बाळ रुग्णालय उभारणी.स्वराज्य पालिका मुख्यालयाच्या निर्मिती,प्रभाग कार्यालये उभारणी,नागरी आरोग्य केंद्राचे जाळे पसरवणे,सिडको नोड मधील सेवा सुविधांचे हस्तांतरण,बगीचे गार्डन हस्तांतरण,रस्त्यांचे कॉक्रीटीकरण,पालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारणी आदींसह असंख्य महत्वाची कामे देशमुख यांनी मार्गी लावली.सत्ताधारी ,विरोधकांना विश्वासात घेऊन समांतर विकासाचा मॉडेल देशमुख यांनी पनवेल मध्ये यशस्वी केल्याने त्यांच्या योगदानाबाबत सत्ताधारी आणि विरोधकही विशेष कौतुक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका