शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:21 AM

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली.

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचाही समावेश असून त्यांची महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर नांदेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी विरु द्ध आयुक्त असा वाद विकोपाला गेला होता. त्यानुसार सत्ताधारी भाजपाने आयुक्तांविरोधात अविश्वास मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. या अविश्वास ठरावात आयुक्तांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांवरील अविश्वास ठराव निलंबित करीत त्यांना अप्रत्यक्ष अभय दिले होते. या निर्णयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी पनवेलमधील सत्ताधाºयांना घरचा अहेर दिल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे पनवेलकरांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आयुक्तांना क्लीन चिट दिली तरी त्यांची बदली करून पनवेलमधील भाजपाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या पनवेलमध्ये रंगली आहे.आयुक्त डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील अनेक सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. त्यासाठी आयुक्तांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठराव मंजूर करीत तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अरु ण भिसे, कांतीलाल कडू यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध कार्यक्र म राबवून आयुक्तांची बदली थांबविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले होते.विशेष म्हणजे यासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचीदेखील भेट घेतली होती. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या शेकापनेदेखील आयुक्तांच्या अविश्वास ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली होती. यातच डॉ. शिंदे यांची तडकाफडकी बदली झाल्याने राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आयुक्तांच्या बदलीमुळे सत्ताधारी भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. तर या निर्णयाच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय सामाजिक संघटनांनी घेतला आहे.एकीकडे शासन आयुक्तांना त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल क्लीन चिट देते आणि दुसरीकडे लगेच त्यांची बदली करते, हे चुकीचे आहे. हाच का भाजपाचा पारदर्शक कारभार? आयुक्तांची बदली झाली असली तरी सत्ताधाºयांना कायद्यांनुसार कामकाज करावे लागणार आहे. पालिकेत आम्ही कोणाची मुजोरी खपवून घेणार नाही .- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेतेआयुक्त्यांच्या बदलीविरोधात मी काहीही प्रतिक्रि या देणार नाही. मात्र प्रशासकीय अधिकाºयांच्या बदल्या होतच असतात.- परेश ठाकूर,सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेल