शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

अतिक्रमणांमुळे पनवेल-मुंब्रा महामार्ग आला धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:29 IST

सिडको, रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेज, भंगार दुकाने, गोदामे आणि टायर दुकाने थाटण्यात आली आहेत. कळंबोली सर्कलपासून ते कल्याण फाट्यापर्यंत  या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. महामार्गालगत अवजड  वाहनांच्या गॅरेजमुळे कित्येकदा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तर जागा अडवल्यानेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याकडे सिडको, रस्ते विकास  महामंडळ आणि महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

पनवेल परिसरातून जाणाऱ्या महामार्गापैकी पनवेल-मुंब्रा महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. या महामार्गावरून कल्याण, नाशिक, ठाणे, गुजरातकडे  जाण्याकरिता  या महामार्गाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर जेएनपीटी आणि कळंबोली लोह पोलाद मार्केटकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली सर्कल महामार्गालगत भंगार दुकाने,  पीओपी दुकान, टायर दुकाने, नर्सरी, मातीचे मडके, गोदाम, अवजड वाहनांच्या गॅरेजवाल्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. कळंबोली  रस्त्यालगच गॅरेज असल्याने वाहने दुरुस्तीसाठी रस्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कळंबोली गावालगतच अतिक्रमण करण्यात आल्याने या ठिकाणी रहदारीत वाढ झाली आहे. अनेकदा या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे बाजूला असलेले कळंबोली गाव असुरक्षित झाले आहे. गेल्या वर्षी  सिडकोकडून कळंबोली महामार्गालगतच्या  दुकानांवर हातोडा मारला होता. कोरोनाची टाळेबंदी उठल्यानंतर अतिक्रमणात भर पडली आहे. याकडे सिडको, रस्तेविकास महामंडळ, महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

रस्त्यालगत गोदामांची बांधकामे मुंब्रा महामार्गालगत तळोजापासून ते शिळफाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गोदामे बांधण्यात आली आहेत. काहींनी जागा विकत घेऊन तिथे लहान लहान दुकाने  काढली आहेत. तर अनेकांनी अतिक्रमण करून गोदामाचे बांधकाम केले आहे. तेच गोदाम भाड्याने देण्यात येत आहे. या गोदामात भंगार व्यवसाय केला जातो. तर इतर वस्तू ठेवण्याकरता त्याचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर धाब्यांसाठी महामार्गालगत माती टाकून अतिक्रमण केले आहे.