शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेक्शन गरम आहे; सध्या शांतता पाळा; अधिवेशनामुळे पनवेलचे लेडीज बार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 10:03 IST

प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी ग्राहक लेडीज बारमध्ये येतात.

वैभव गायकरपनवेल : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे लेडीज बार चर्चेचा विषय ठरत असताे. एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना पनवेलमधील लेडीज बार बारचालकांकडून बंद ठेवण्यात येत आहेत. सेक्शन गरम असल्याने बार बंद ठेवून कमालीची शांतता बाळगण्यात येत असल्याची प्रचिती सध्या येत आहे. 

पनवेल तालुक्यात एकूण २४ सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा बार आहेत. यामध्ये पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत १० बार, पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ९, कळंबोली ३ आणि तळोजा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २ बारचा समावेश आहे. हे कागदोपत्री सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा म्हणून ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी ग्राहक लेडीज बारमध्ये येतात.

या मागील आर्थिक गणितात उत्पादन शुल्क, पोलिस प्रशासन आणि इतर सर्व आस्थापनांना मॅनेज केले जाते. मात्र, अधिवेशनाच्या काळात हे बारमालक रिस्क न घेता हे बार बंद ठेवतात. अधिवेशनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील या हेतूने हे बार जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात. या व्यतिरिक्त सोशल क्लब, हुक्का पार्लर आणि काळा-पिवळा यासारखे अवैध जुगारदेखील पनवेलमध्ये बेसुमार चालतात. अधिवेशनाच्या काळात पनवेलमध्ये हे सर्व धंदे बंद आहेत. सेक्शन गरम असल्याने हे व्यवसाय बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये शुकशुकाट सुरू आहे.

चक्र थांबणार कधी ?अधिवेशन काळात बंद असलेले हे बार अथवा इतर अवैध धंदे इतर वेळा सर्रास सुरू असतात. या आस्थापनांवर कारवाईदेखील वेळोवेळी सुरू असते. मात्र, हे धंदे कायमस्वरूपी कधी बंद होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शासन मनावर घेत नाही तोपर्यंत हे व्यवसाय बंद होणार नाहीत, अन्यथा कारवाईचे चक्र चालूच राहणार आहे.

बारचालकांना वेळेत बंद करण्याच्या सूचना आम्ही यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबत वेळोवेळी कारवाईदेखील सुरूच असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल. - विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय

उत्पादन शुल्क विभागामार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचालकांवर कारवाई करीत असतो. याकरिता आमच्या पथकाची नियमित गस्त या ठिकाणी असते.  - आर. आर. कोळे,  जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादनशुल्क