शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल - कर्जत रेल्वे लाइन जोमात; प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:50 IST

मोहोपे स्टेशनवरून पहिल्या ‘एंड अनलोडिंग रेक’ची धाव...

मुंबई : पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर असून शनिवारी त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळाले. या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला ‘एंड अनलोडिंग रेक’ चालविण्यात आला. 

२६० मीटर लांब आणि ६० किलो वजन असलेल्या रेल पॅनेलची वाहतूक एंड अनलोडिंग रेकच्या माध्यमातून करण्यात आली. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. या रेकचा वापर करून पनवेल-कर्जत मार्गामध्ये लांब वेल्डेड रेल ट्रॅक बसविले जाणार आहेत. याआधी मध्ये रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात मिळविलेल्या रेकचा वापर करून मोहोपे - चिखलेदरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण केले होते. आता डिझाइन केलेले रेक आल्यानंतर, नवीन ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 स्थानके या मार्गावर पनवेल, मोहोपे , चिखले, चौक, कर्जत ही स्थानके आहेत. 

कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्णमोहोपे - चिखले विभाग पूर्ण झाल्यानंतर कर्जत आणि चौक स्टेशन भागात रेल्वे जोडणी निर्माण केली जाणार आहे. लवकरच नवीन रेक मिळेल. पनवेल - कर्जत कॉरिडॉरवर कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे.

प्रकल्प वैशिष्ट्येमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट- ३ अंतर्गत  या कॉरिडॉरचे काम सुरू.

गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण -पनवेल ते कर्जतदरम्यान २९.६ किमी प्रकल्पाला २,७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कर्जत - पनवेल कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनेल. या कॉरिडॉरमुळे प्रादेशिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवासाच्या वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल. 

टॅग्स :railwayरेल्वे