शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आरोग्यसेवा सलाइनवर

By admin | Updated: February 14, 2016 03:15 IST

तालुक्यामधील ७ लाख ५० हजार लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेची फक्त पाच आरोग्य केंद्रे आहेत. नेरेमध्ये उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४६ गावांचा समावेश होतो.

- वैभव गायकर,  पनवेलतालुक्यामधील ७ लाख ५० हजार लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेची फक्त पाच आरोग्य केंद्रे आहेत. नेरेमध्ये उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४६ गावांचा समावेश होतो. केंद्रातील दोनही डॉक्टर उच्च शिक्षणासाठी सुटीवर आहेत. एकमेव रुग्णवाहिका चालक नसल्याने बंद ठेवली असून, परिसरातील नागरिकांना खासगी दवाखान्यात किंवा मुंबई, नवी मुंबईमध्ये उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. महाराष्ट्रातील सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेल्या तालुक्यामध्ये पनवेलचा समावेश आहे. खारघर ते पनवेलपर्यंतच्या गावांचा विकास सिडकोने केला आहे. उर्वरित गावांच्या परिसर नयना क्षेत्रात मोडत असून, तेथेही शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. १९५१ मध्ये पूर्ण तालुक्याची लोकसंख्या १४,८६१ होती. पुढील ६५ वर्षांत तब्बल ५० पट लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या ७ लाख ५० हजार २५६ झाली असली तरी त्या प्रमाणात अत्यावश्यक सुविधा मात्र उपलब्ध झालेल्या नाहीत. आरोग्य ही तालुक्यातील सर्वात गंभीर समस्या आहे. देशातील पहिली स्मार्ट सिटी दक्षिण नवी मुंबई होणार असली तरी येथील आरोग्य यंत्रणा अद्याप जिल्हा परिषदेच्या भरवशावरच सुरू आहे. जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधून वैद्यकीय सुविधा देत असल्याचे भासविण्यास सुरुवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत विदारक आहे. तालुक्यामधील पाचपैकी नेरे हे प्रमुख आरोग्य केंद्र. या केंद्राच्या अखत्यारीत वाजे, रिटघर, धामणी, खारघर उपकेंद्रांचा समावेश होतो. परिसरातील जवळपास ४६ गावांमध्ये दीड लाख नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी एक पूर्णवेळ डॉक्टरही जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देता आलेला नाही. नेरे आरोग्य केंद्रासाठी २ वैद्यकीय अधिकारी, ३ शिपाई, २ स्वीपर, ३ आरोग्य साहाय्यिका, २ आरोग्य सेविका व फार्मासिस्ट, कुष्ठरोगतज्ज्ञ, क्लार्क प्रत्येकी एक एवढी पदे मंजूर आहेत. येथे नियुक्त केलेले दोनही वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी सुटीवर आहेत. यामुळे गव्हाणमधील डॉक्टरांकडे नेरेचाही पदभार देण्यात आला आहे. आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. परंतु चालक निवृत्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका बंदच आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास १०८ क्रमांकावर फोन करून आजीवलीमधील रुग्णवाहिका मागवावी लागत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असेल तर ती पोहचण्यासाठी ३० ते ४० मिनिटे लागत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे वाजे, मोरबे, रिटघर, धामणी, खारघर उपकेंद्रांची स्थितीही बिकट आहे. प्रत्येक नोडला हॉस्पिटल हवे पूर्णपणे शहरीकरण झालेल्या पनवेल तालुक्याची आरोग्य यंत्रणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे. आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच असून, त्यांचा नागरिकांना फारसा उपयोग होत नाही. एक ते दीड लाख लोकसंख्येसाठी १ आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. याऐवजी आता प्रत्येक आरोग्य केंद्राच्या जागेवर किमान ५० बेडचे रूग्णालय असणे आवश्यक आहे. माताबाल रुग्णालय व सर्वसाधारण रुग्णालयेही असली पाहिजेत. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी घोषणा करणाऱ्या सिडकोनेही चांगली आरोग्य यंत्रणा उभी केलेली नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत आहे.खासगी रुग्णालयांकडून लूटपनवेल तालुक्यामध्ये शासकीय रूग्णालयच नसल्याने नागरिकांना खाजगी रूग्णालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. खाजगी रूग्णालयामध्ये जादा फी आकारली जात आहे. जुनमध्ये याच परिसरात अपघात होवून डी. एच. मोरे हे टेंपो चालक गंभीर जखमी झाले. खाजगी रूग्णवाहीकेने त्यांना पनवेलमधील खाजगी रूग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्ताच्या खिशातील २० हजार रूपये चोरीला गेले व तिन तास रूग्णालयात काहीही उपचार केले नसताना १५ हजार रूपये बिल भरावे लागले. डॉक्टरांशिवाय चालते आरोग्य केंद्र सद्यस्थितीमध्ये एकही निवासी डॉक्टर नाही. गव्हाण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनाच येथील पदभार देण्यात आला आहे. डॉक्टरांप्रमाणे रूग्णवाहीकेचीही स्थिती आहे. चालकाअभावी रूग्णवाहीका बंद आहे.नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांच्या स्थितीची पाहणी केली जाईल. या केंद्रामधील गैरसोयी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - राजेंद्र खंडागळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.