शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

पनवेलच्या आयुक्तांना सत्ताधा-यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:35 IST

पनवेल शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडलेल्या प्रभागनिहाय समित्यांच्या ठरावाला सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. पनवेल महानगर पालिकेची महासभा गुरुवारी पार पडली.

वैभव गायकर पनवेल : पनवेल शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडलेल्या प्रभागनिहाय समित्यांच्या ठरावाला सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. पनवेल महानगर पालिकेची महासभा गुरुवारी पार पडली. या वेळी आयुक्तांनी मांडलेला प्रभाग समित्यांचा ठराव २७ विरु द्ध ४९ अशा मतांनी नामंजूर करत नवीन ठराव संख्याबळाच्या जोरावर मंजूर करण्यात आला.आयुक्तांनी मांडलेल्या प्रभाग समित्यांमध्ये खारघरच्या प्रभाग ६ चा समावेश कळंबोलीमध्ये करण्यात आला होता. त्याला भाजपा सदस्यांनी विरोध दर्शविला. डॉ. शिंदे हे पालिकेच्या स्थापनेपासून प्रशासक म्हणून पालिकेची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना प्रथमच सत्ताधाºयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.विशेष म्हणजे या ठरावाला विरोधक शेकाप तसेच महाआघाडीच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. मात्र भाजपाच्या संख्याबळामुळे गटनेते परेश ठाकूर यांनी मांडलेला ठराव सभागृहाला मंजूर करावा लागला. समितीच्या स्थापनेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये दुमत असल्याने पालिकेच्या महासभेत पहिल्याच विषयावरून गदारोळ सुरू झाला. सत्ताधाºयांच्या ठरावाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिला.सभागृहाचे कामकाज सुरू करण्यापूर्वी भारताचे १४ वे नवनियुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिनंदनाचा ठराव आयुक्तांनी घेतला नसल्याने विरोधकांनी पालिका आयुक्त व महापौरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अभिनंदनाचा ठराव व घाटकोपर येथील इमारतीत मृत पावलेल्या रहिवाशांचा दुखवट्याचा ठराव घेतला.पालिकेने प्रभाग समित्यांचा ठराव मांडताना चार समित्यांमध्ये पहिल्या समितीत प्रभाग १ ते ५, दुसºया समितीत ६ ते १०, तिसºया समितीत ११ ते १५, तर चौथ्या समितीत १६ ते २० असा समावेश करण्यात आला होता.ठरावाला भाजपा नगरसेवक प्रकाश बिनेदार, नीलेश बाविस्कर, लीना गरड आदींनी विरोध दर्शविला. त्यानंतर गटनेते परेश ठाकूर यांनी नव्याने हा ठराव मांडत बहुमताने पारित केला. नव्या ठरावानुसार पहिल्या प्रभाग समितीत १ ते ६, दुसºया समितीत ७ ते १०, १५, १६, तिसºया समितीत ११ ते १४ तर चौथ्या समितीत १७ ते १० प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग समित्यांच्या चर्चेदरम्यान नगरसेवक जगदीश गायकवाड व सतीश पाटील यांच्या दरम्यान तू तू मै मै झाली. तुम्ही अलिबागवरून आला आहात का, असे उद्गार जगदीश गायकवाड यांनी सतीश पाटील यांच्यासाठी काढल्यावर गटनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी उभे राहून जोरदारपणे विरोध करीत गायकवाड यांच्या माफीची मागणी केली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्तक्षेपानंतर या विषयावर पडदा पडला. त्यानंतर नगरसेवक हरेश केणी यांनी महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची मागणी केली. यानंतर भाजपाचे गटनेते परेश ठाकूर यांनी विषय समित्या गठित करण्याची मागणी सभागृहात महापौरांकडे केली. सात समित्या गठित करण्याचा ठराव त्यांनी महापौरांसमोर मांडला. त्यामध्ये महिला व बाल कल्याण समिती, झोपडपट्टी पुनर्वसन व सुधार समिती, शिक्षण क्रीडा समिती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व स्वच्छता, उद्याने सुशोभीकरण, पाणीपुरवठा मलनिस्सारण या सात समित्यांचा यामध्ये समावेश आहे.कळंबोलीमधील केएल-४मधील धोकादायक इमारतीवर या वेळी शेकाप नगरसेवक मुकादम यांनी सर्वांचे लक्ष वेधले. इमारतीची बकाल अवस्था झाली असून, रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. यासंदर्भात महापौर, पालिका आयुक्तांनी जागेची पाहणी करून इमारतीच्या पुनर्विकासाबद्दल पाठपुराव्याची मागणी केली.खारघर शहरातील नो लीकर झोनचा विषयखारघर शहरातील हॉटेल रॉयल ट्युलिपला पुन्हा एकदा दारूविक्र ीचा परवाना मिळाला असल्याने येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शेकापचे गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली. भाजपा नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यासंदर्भात पालिका क्षेत्राला संपूर्ण दारूमुक्त करण्याचा विचार करण्यात यावा, अशी सूचना अरविंद म्हात्रे यांनी मांडली.मोडकळीस आलेल्या राजिप शाळांचा विषयखारघर शहरातील मुर्बी गावात राजिप शाळा अतिशय धोकादायक आहे. या धोकादायक इमारतीत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पालिका क्षेत्रातील अनेक राजिप शाळांचा सर्व्हे करून विद्यार्थ्यांचे योग्य असे पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करावे, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली.प्लास्टिकमुक्त पालिका असावीसभागृहात नगरसेवक हरेश केणी यांनी पनवेल महानगरपालिका प्लास्टिकमुक्त असावी, असा प्रस्ताव मांडला. तसेच पनवेल तालुक्यात लहान-मोठी आठ धरणे आहेत, त्यांना विकसित केल्यास पालिका क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असे सांगितले.प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांबाबत लक्षवेधीपनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोड लगत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना सिडको प्रशासन नोटिसा देऊन ती घरे अनधिकृत ठरवत आहे. यासंदर्भात पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी या वेळी भगत यांनी केली.फेरीवाल्यांसाठी धोरणपालिका क्षेत्रातील सिडकोने सर्व्हे केलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करू नये, त्यांना अभय देणे गरजेचे आहे, यासंदर्भात पालिकेने धोरण राबविण्याची गरज असल्याचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी सांगितले.