शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

सूरतच्या धर्तीवर उभारले जाणार पनवेलचे बस आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:37 IST

२३० कोटी खर्च : १७५०० चौरस मीटरवर अद्ययावत बसस्थानक

पनवेल : राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल डेपोमधील समस्या कायमस्वरूपी सुटणार आहेत. सूरतच्या धर्तीवर नवीन डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३० कोटी रुपये खर्च करून १७५०० चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत बसस्थानक उभारणार आहे.पनवेल हे सिडको कार्यक्षेत्रामधील एकमेव एसटी आगार आहे. बसस्थानकाला समस्यांचा विळखा पडला आहे. पावसाळ्यात डेपो खड्डेमय होत असतो. इतरही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी अत्याधुनिक एसटी डेपो उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. गुजरातमधील सूरत बस डेपोच्या धर्तीवर अद्ययावत एसटी आगार बनविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी बांधकामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांशी चर्चायेथील कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेसंबंधी चर्चा करण्यासाठी गुरु वारी आगारात महामंडळाचे कार्यकारी अभियंता विनित कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा केली. या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, सरचिटणीस श्रीकांत बापट, के. जी. म्हात्रे आदी उपस्थित होते.एसटी आगारात आधुनिक सुविधापनवेल आगारात दररोज ४२०० एसटी गाड्या ये-जा करीत असतात. आजमितीस आगारात २६ फलाट आहेत. नवीन प्रस्तावित स्थानकात ३० फलाट असणार आहेत. या स्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित ठेकेदाराला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली असून, प्रत्यक्ष कामाला पावसाळ्यानंतरच सुरु वात केली जाणार आहे.आतापर्यंत या स्थानकाच्या कामाला पाच, सात वर्षे उशीर झालेला असल्याने, काम मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाºयांन दिलेले आहेत. हे काम ठेकेदाराने मुदतीपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास त्यास एसटीतर्फे प्रोत्साहन बक्षीस देण्यात यावे.- प्रशांत ठाकूर,आमदार

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई