शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलची कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद, आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 02:34 IST

Panvel News : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. पनवेल शहरातील शिवाजी चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘मजदूर किसान एकता जिंदाबाद जिंदाबाद’, ‘बघता काय? सामील व्हा!’, ‘किसानविरोधी बिल मागे घ्या - मागे घ्या’, ‘अमित शहा हाय हाय’ आदी घोषणा देण्यात आल्या.

पनवेल : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. पनवेल शहरातील शिवाजी चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘मजदूर किसान एकता जिंदाबाद जिंदाबाद’, ‘बघता काय? सामील व्हा!’, ‘किसानविरोधी बिल मागे घ्या - मागे घ्या’, ‘अमित शहा हाय हाय’ आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, सुदाम पाटील, शिरीष घरत, आर. सी. घरत आदींसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठ, काही दुकाने, मॉल्स या वेळी बंद होते. पनवेलसह खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजे या ठिकाणी दुकाने काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर पालिका हद्दीतील बरीचशी दुकाने सुरू झाली.राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र पाहावयास मिळत आहे. पनवेलमध्येदेखील भाजपच्या व्यापारी संघटनांनी या बंदला विरोध केल्याचे दिसून आले. खारघर शहरातील शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर, मंगेश रनावडे यांनी शहरात निदर्शने केली. 

कळंबोलीत बंदकळंबोली : केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याकरिता कळंबोली, कामोठे परिसरातील व्यावसायिकधारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, भारत बंदला पनवेल महापालिका क्षेत्रातून समिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच दुकाने बंद ठेवल्याने परिसरात शांतता होती. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

टॅग्स :panvelपनवेल