शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पेंधर उड्डाणपुलाचा अडथळा दूर; भूधारकाला मोबदला देण्याची सिडकोची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:12 IST

खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली.

- वैभव गायकरपनवेल : खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. परंतु सिडकोने नमते घेतल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खारघर ते तळोजा शहराला जोडणाºया पुलाचे काम सुरू असलेली जागा असंपादित आहे. संबंधित जागेच्या मालकाची परवानगी न घेता सिडकोने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. पेंधर गावातील शेतकरी जहूर पटेल यांची या परिसरात सुमारे ४५ गुंठे जागा आहे. ही जागा संपादनातून वगळण्यात आल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या २00७ च्या राजपत्रात आहे. असे असतानाही सिडकोने २0१२ मध्ये या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू केले. या कामाला सदर शेतकºयाने विरोध केला. त्यामुळे हे काम थांबले. दरम्यान, ही जागा प्रकल्पासाठी द्यावी, यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू झाले. त्याबदल्यात या शेतकºयाला २२.५ टक्केचे पॅकेज देण्याचेही सिडकोकडून आमिष दाखविण्यात आले. परंतु शेतकरी जहूर पटेल यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. आपली एकूण जागा ४५ गुंठे इतकी असताना २२.५ टक्के भूखंड का म्हणून घ्यायचा असा पवित्रा पटेल यांनी घेतला. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर उड्डाणपुलाची गरज लक्षात घेवून सिडकोने या प्रकरणात काहीशी सामंजस्याची भूमिका घेत पटेल यांच्या ४५ गुंठे जागेच्या बदल्यात तितकीच जागा अन्य ठिकाणी देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे या जागेवर असलेले हॉटेलचे बांधकाम हटविण्यासाठी सिडकोने शेतकºयाला ७२ लाख रुपयेसुध्दा दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. खारघर शहर व तळोजा फेज २ ला जोडणाºया पुलामुळे दोन्ही शहरामधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी नुकताच सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.मुंब्रा-पनवेल महामार्गावर अवजड वाहनांची ये-जा असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील रखडल्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात. तसेच तळोजा फेज -२ मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे नोकरदारवर्गाला या नव्या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तळोजामध्ये वाहतूककोंडीची समस्या जटील आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर खारघर शहरामधील सर्व वाहतूक नव्या खारघर - तळोजा मार्गावर वळणार आहे. सध्या मागील सहा वर्षांपासून रखडलेले हे काम शीघ्र गतीने मार्गी लावण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे. सिडकोने तातडीने हे काम पूर्ण करावे, जेणेकरून खारघर शहरातून तळोजा (पेंधर) कडे जाणाºया रहिवाशांचा मार्ग सुकर होईल, अशी प्रतिक्रिया तळोजा येथील नगरसेवक अजीज पटेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शेतकºयाच्या लढ्याला यशखासगी जागा असताना देखील सिडकोने या जागेवर उड्डाणपूल उभारताना शेतकºयाला विश्वासात घेतले नव्हते. २0१५ मध्ये सिडकोने या जागेसंबंधी बैठकीकरिता बोलावले होते. संबंधित जागेचा २२.५ टक्के मोबदला देण्याचे आमिष शेतकºयाला दिले होते. परंतु १00 टक्के जागा हवी, अशी भूमिका शेतकºयाने घेतली. अखेर एप्रिल २0१८ मध्ये सिडकोने नमती भूमिका घेत शेतकºयाच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे बहुद्देशीय उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :panvelपनवेल