शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धकालीन लेण्यांना ठरविले पांडवकालीन

By admin | Updated: January 6, 2017 05:54 IST

नवी मुंबइतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यातील नावीन्यतेसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत आहे. आता तेथील बहुचर्चित बौद्ध लेण्यांचे

आविष्कार देसाई, अलिबागनवी मुंबइतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यातील नावीन्यतेसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत आहे. आता तेथील बहुचर्चित बौद्ध लेण्यांचे (सध्याचे केरू माता मंदिर) रूपांतर पांडवकालीन लेण्यांत करण्याचा वेगवान निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बौद्धकालीन लेण्यांची नोंदणी चुकीची झाली आहे. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पनवेल तालुक्यातील उलवे गणेशपुरी वाघोलीवाडा येथे बौद्ध धर्मीयांची वस्ती आहे. त्यांच्या राहत्या घराच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर घालाव्यात, यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत; परंतु पनवेल प्रशासनातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथील वस्तीचा पंचनामा करण्यासाठी पुढे आला नाही. वस्तीला लागूनच बौद्ध लेणी (सध्याचे केरूमाता मंदिर) आहेत. राज्य सरकारच्या पुरातन विभागाने बौद्ध लेणी अशी नोंद केल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पनवेलच्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचनामा केला; परंतु पंचनामा करताना तक्रारदाराला बोलवलेच नाही. पंचनामा करताना बौद्धकालीन लेण्यांना पांडवकालीन लेणी ठरवले. हा पंचनामा खोटा असल्याचा दावा सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने निवदेनात केला आहे. यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. महसूल प्रशासनाला वस्तीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. त्याच प्रशासनाने बौद्धकालीन लेण्यांना पांडवकालीन ठरविण्यासाठी जलद कारवाई का केली? असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे. विमानतळासाठी सपाटी करणाचे काम सुरू असून त्याचे टेंडर हे सुमारे एक हजार ८०० कोटी रुपयांचे आहे.