शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 05:51 IST

जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

नवी मुंबई : सुमारे ३४ हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या डीएचएलएफचे धीरज वाधवान व कपिल वाधवान या दोघा भावंडांना जे.जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विशेष सवलत दिल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील एक अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तळोजा कारागृहातील कैद्यांना पोलिस सुरक्षेत तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना नियमबाह्य सवलती दिल्या जात असल्याची बाब समोर आली होती. 

उपायुक्तांनी केली कारवाईनिलंबित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे निलंबनाचे अधिकार असलेल्या पोलिस आयुक्तांऐवजी मुख्यालय उपायुक्तांनी कारवाई केल्याचीही चर्चा आहे.

कैद्यांना दिली व्हीआयपी वागणूकधीरज वाधवान व कपिल वाधवान या दोघा भावंडांना पोलिसांकडून विशेष सवलत मिळत होती. त्यांना रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कुटुंबासह घरचे जेवण खाण्याची तसेच मोबाइल व लॅपटॉप वापरण्याची मुभा दिली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर नवी मुंबई पोलिस मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी संबंधित सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

हे आहेत ते कर्मचारीनिलंबित केलेल्यांमध्ये उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, हवालदार विशाल दखने, सागर देशमुख, प्राजक्ता पाटील, रवींद्र देवरे, प्रदीप लोखंडे व माया बारवे यांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई