शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पामबीचवरील गॅरेजेस पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 23:45 IST

महापालिकेचे दुर्लक्ष: वाहतूककोंडीमुळे वाहनधारक त्रस्त

नवी मुंबई : वाशी पामबीच मार्गावरील गॅरेजेस आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. या दुकानांमुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गेल्या वर्षी विशेष मोहीम काढून येथील दुकाने बंद केली होती; परंतु आता पुन्हा ही दुकाने सुरू झाली आहेत. या प्रकाराला महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.

एपीएमसीच्या हद्दीत पामबीच मार्गावरील सत्रा प्लाझा इमारतीपर्यंत गॅरेज व वाहनांच्या स्पेअर पाटर््स विक्रीच्या दुकानांची बजबजपुरी झाली आहे. वाहने रस्त्यावर उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे पामबीच मार्गावरील वाहनांच्या गतीला ब्रेक लागत आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात नियमित वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.

विशेष म्हणजे पामबीच मार्गावर वाहनांची पार्किंग करण्यास मनाई आहे. शिवाय या परिसरात असलेली कार्यालये, दुकानांसाठी मागच्या बाजूने प्रवेश आहे; परंतु नियमाला हरताळ फासत येथील गाळेधारकांनी पामबीच मार्गाच्या दिशेने प्रवेश सुरू केले आहेत.पामबीच मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने धडक मोहीम राबवून या परिसरातील सर्व गॅरेजेस आणि स्पेअर पार्ट विक्रीच्या दुकानांना टाळे ठोकले होते. ही दुकाने पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी पदपथावर लोखंडी बॅरियर उभारले होते. या विशेष कारवाईमुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली होती; परंतु कारवाईनंतर काही दिवसांतच बंद करण्यात आलेली ही दुकाने पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पदपथावर वाहन दुरुस्तीपामबीच मार्गावर वाहने उभी करून सर्रासपणे दुरुस्तीची कामे केली जातात. अनेकदा पदपथांचाही वापर केला जातो. पदपथांवर खासगी वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीसह अपघाताची शक्यता बळावली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूककोंडीचा त्रास, अपघाताची शक्यता आहे.