शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉल्सधारकांचा ‘कारभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:24 IST

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी

प्राची सोनवणे  नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी स्टॉल्सचे वितरण केले आहे; परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी नियमबाह्यपणे स्टॉल्स भाडेतत्त्वावर दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे व संबंधितांना योग्य सूचना देण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.महानगरपालिका, सिडको व इतर शासकीय संस्था अपंग, युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यांना एसटीडी, पीसीओ, झेरॉक्स, फॅक्स बुथ, लॉटरी तिकीट विक्री, वृत्तपत्रे विक्र ी, पानविडी स्टॉल्स, चर्मकार यांनी महापालिकेने दिलेल्या अटीनुसार विशिष्ट व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, या जागेचा गैरवापर करून या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. महापालिकेकडून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकी स्टॉलकरिता ५ चौ.मी. जागा देण्यात आली असून, या जागेतच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी स्टॉलधारकांनी या ठरवून दिलेल्या व्यवसायांव्यतिरिक्त इतर व्यवसाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेकांनी हे स्टॉल्स भाडेतत्त्वावर दिले आहेत. सीबीडी बस डेपोसमोरील स्टॉल्सचा वापर ट्रॅव्हल एजन्सीकरिता केला जात असून, या ठिकाणी तिकिटांच्या ग्राहकांकडून पैसे उकळले जात असून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या अटीनुसार अनुज्ञापत्रामध्ये नमूद केलेल्या जागेवर अनुज्ञापत्रधारकाचा मालकी हक्क, भाडेकरू किंवा अन्य कोणताही हक्क राहणार नाही. ही जागा इतर कोणासही भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय थाटल्याचे चित्र पाहायला मिळते. नियमानुसार स्टॉलधारकांना 0.३ मीटर उंचीच्या नामफलकाव्यतिरिक्त इतर कोणताही जाहिरात फलक प्रदर्शित करता येणार नाही, असे असतानादेखील विविध मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती, यात्रा कंपन्यांची माहिती देणारे फलक लावलेले पाहायला मिळतात. नेरु ळ, सानपाडा, वाशी, बेलापूर आदी परिसरातील चर्मकारांनी या स्टॉल्सवर दुकाने थाटली असून रस्त्याची अडवणूक केल्याचे चित्र पाहायला मिळते.महापालिकेच्या वतीने जवळपास २0 हून अधिक नियम व अटी लागू केल्या असून, त्यांचे पालन केले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते.अशा प्रकारे जागेचा गैरवापर करणाºया व्यावसायिकांना याबाबत विचारणा केली असता, महापालिका अधिकारी तसेच पोलिसांना याविषयी माहिती आहे; पण आमच्यावर कारवाई केली जात नाही, असे निर्भयपणे सांगण्यात आले. मालमत्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन करणाºयांवर रीतसर कारवाई केली जात असल्याचा खोटा दावा करण्यात आला.