शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सात हजार मच्छीमार बोटींवर गंडांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:35 IST

राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवरपेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या  सुमारे ७००० मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारी करतात

मधुकर ठाकूरउरण :  राज्यातील १२० अश्वशक्ती इंजिनवरील मच्छीमार नौकांना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय तत्काळ रद्द करून डिझेल कोटा पूर्ववत सुरू करण्याची मागणी अनेक मच्छीमार संस्थांनी मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवरपेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या  सुमारे ७००० मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारी करतात. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रधान सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत मागील काही वर्षांत १२० हॉर्स पॉवरपेक्षा अधिक अश्वशक्ती असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा आणि परतावे वितरणावर लेखा परीक्षकांनी आक्षेप घेतला आहे. याची दखल घेऊन १२० हॉर्स पॉवरपेक्षा अधिक अश्वशक्ती असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील १२० अश्वशक्ती इंजिनवरील मच्छीमार नौकांना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय रद्द करून डिझेल कोटा पूर्ववत सुरू करण्याची मागणी याआधीही मत्स्यव्यवसायमंत्री, आयुक्तांकडे  अनेक मच्छीमार संस्थांनी केली आहे. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होत आहे. याआधीच मागणीबाबत निर्णयाची गरज आहे. -भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था 

n या आदेशाचा फटका राज्यातील सुमारे ७ हजार मच्छीमार नौकांना बसला आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या (एनसीडीसी) योजने अंतर्गत कर्ज काढून हजारो मच्छीमारांनी नवीन मच्छीमार बोटी बांधल्या आहेत. या योजनेतून बांधण्यात आलेल्या मच्छीमार नौकांना १०० ते २०० अश्वशक्तीचे इंजिन वापरण्याची परवानगी मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. n परवानगीनंतर एनसीडीसी  योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो मच्छीमार नौकांवर १००-२०० अश्वशक्तीवरील इंजिन बसविण्यात आलेली आहेत. अशा कर्ज काढून उभारण्यात आलेल्या मच्छीमार नौकांनाही डिझेल कोट्यातून वगळण्याने आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये असंतोष आहे.

n मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेले आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी याआधीही विविध स्तरांवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

n हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री, खासदार श्रीरंग मत्स्यव्यवसाय आयुक्तांनाही निवेदन देण्यात आली असल्याची माहिती वैष्णवी माता मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष मार्तंड नाखवा व व्यावसायिक हेमंत गौरीकर यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणfishermanमच्छीमार